निकम स्पोर्ट्स क्लब तर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन..!
पाटण. - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - प्रतिनिधी चंद्रकांत सुतार - पाटणसह परिसरातील अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या निकम स्पोर्ट्स क्लबच्या वतीने १ मे ते १५ मे ५ वर्षांच्या वरील मुला-मुलींसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ दिवस चालणाऱ्या शिबिरात विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. १ मे ते १५ मे या कालावधीत शिबिरामध्ये प्रशिक्षण, कराटे, योगा, पोहणे, जंगल सफारी, किल्ले परिक्रमा, वक्तृत्व व नेतृत्व यांचे तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रशिक्षण होणार असून या शिबिरासाठी मर्यादित प्रवेश ठेवण्यात आले आहेत. पहिल्या २० खेळाडूंना विशेष सवलत देण्यात येणार आहे.
निकम स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून अनेक खेळाडूंना राज्य व जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळाली आहे. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातूनही खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाचा प्रयत्न आहे. असे आवाहन क्लब चे व्यवस्थापक चंद्रगुप्त निकम यांनी केले आहे. संपर्क - १९६८९८१००८०


0 टिप्पण्या