Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


संतोष गणपत बनसोडे यांना ही राज्यस्तरीय व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती दुत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कोल्हापूर - संजय डुबल  : समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रीफील हेल्थ प्रो. प्रा. लि., शिवशंभु व्यसनमुक्ती केंद्र, कोल्हापूर अंतर्गत दि २५ जुन 2023 रोजी कोल्हापुर येथे राज्यस्तरीयथृ व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्तीदुत हा पुरस्कार सोहळा संपन्न् झाला, संस्थेचे १६ हजार पी.आर.ओ. व विस्तार अधिकारी देशभर कार्यरत असुन पैकी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५१ पी. आर.ओ. व  विस्तार अधिकारी यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानपुर्वक प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत  राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
      यामध्ये संस्थेचे पी. आर. ओ. व विस्तार अधिकारी  संतोष गणपत बनसोडे. रा. प्रभादेवी व विक्रोळी मुंबई यांना ही राज्यस्तरीय व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती दुत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
    समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने, मागील सात वर्षे व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती अभियान देशपातळीवर राबवले जाते, व्यसनी व मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती ना त्रासातुन मुक्त होण्यासाठी समर्थ सोशल फौंडेशन चे मदतीने त्यांनी हजारो पिडित व्यक्ती ना त्यांनी मदत केली आहे, पर्यायाने व्यसनामुळे व मधुमेहाच्या त्रासातुन उध्वस्त होणारी कुटुंब वाचवण्याचे काम   संतोष गणपत बनसोडे यांचे हातुन झालेले आहे. 
      संतोष गणपत बनसोडे यांनी संस्थेच्या माध्व्ययमातुन शेकडो व्यक्तींना व्यसनां पासुन मुक्त केलेच, शिवाय गरजुंचे पुनर्वसन करण्याचे व त्यास स्वताचे पायावर उभे करण्याचे महत्वपुर्ण कार्य ही संतोष बनसोडे यांनी समर्थ सोशल फौंडेशन चे माध्यमातुन केले आहे, त्यांच्या या गौरवास्पद  कामगिरी बद्दल व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती दुत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
      पुरस्कार वितरण सोहळ्याच्या या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, कराडचे नायब तहसीलदार विजय माने साहेब, पंजाब नॕशनल बँक मेटलाइफ कोल्हापूरचे शाखा व्यवस्थापक नारायण पवार साहेब, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे सागर देसाई साहेब, महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे साहेब, मध्य प्रदेश येथुन खास उपस्थित राहिलेले स्वामी वासुदेव नंदगिरी महाराज आदी प्रमुख मान्यवरांचे हस्ते व संस्थेचे संचालक अस्लम शेख, सुहास पाटील तसेच सर्व संचालक यांचे उपस्थितीत संतोष बनसोडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement