👉अतुल आपले पुर्ण नाव प्रेक्षकांना कळेल का ? -
अतुल आत्माराम लोहार.
👉पत्ता
म्हावशी, ता. पाटण जि. सातारा.
👉जन्मतारीख किती ?
25 मे
👉 शालेय शिक्षण कुठे झाले ?
प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन ?
प्राथमिक - जिल्हा परिषद शाळा, म्हावशी.
माध्यमिक - साळुंखे हायस्कुल पाटण. जि. सातारा.
👉पिकुली चित्रपटातील गाण्याला संगीत दिले त्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणुन तुला सह्याद्री सिने अॕवाॕर्ड, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्या बद्दल अभिनंदन पण संगीत या विषयाची आवड तुला कधी निर्माण झाली ?
साळुंखे हायस्कुल ला शिकत असताना मला बासरी वाजवायचा छंद जडला व बासरी शिकत असतानाच संगीताचे प्राथमिक धडे मिळत गेले व येथुनच प्रवास सुरू झाला.
👉 आज तु गीतकार,गायक व संगीतकार म्हणुन चित्रपट अल्बम करत आहेस तर तुझे पहिले गीत किंवा अल्बम कोणता. त्या बद्दल माहीती मिळेल का ?
आम्ही वीस वर्षापुर्वी बहुरूपी कला अकादमी ची स्थापना केली होती. याचे प्रमुख संजय शिवदास, वीस बावीस वर्षांपुर्वी मुंबईत प्रायोगिक व व्यावसायिक नाटकात, मालिकेत भुमिका साकारणारे संजय डुबल ,अमर पाटील,दिलिप चौधरी, सुर्यकांत मोळावडे, अनुराधा, प्रज्ञा, प्राजक्ता, आम्ही सर्वांनी मिळुन नाट्य संस्थेची स्थापना केली. त्यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 'भेट' ही एकांकिका बसवली होती. 'भेट एकांकिका बसवत असताना 'तुझी न माझी भेट अखेरची ही भेट' हे गीत लिहील. व याची चालही मी लावण्यास शिकलो. गायलं ही मीच व याचे संगीत ही मीच दिले.
या गाण्यापासुन खरी सुरवात झाली. त्यानंतर भेट या थीम वर अजुन काही गीत लिहीले व 'भेट' नावाचा माझा पहिला अल्बम 2004 साली प्रदर्शित झाला.
थोडीफार मदत झाली, पण माझी गीतकार गायक व संगीतकार तिन्ही बाबतीत संपुर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर ओळख झाली ती तुझा झगा ग झगा ग वा-यावर उडतो या गीताने. प्रचंड लोकप्रिय झाले हे गीत.
👉तुला सर्वोत्तम संगितकार म्हणुन सह्याद्री सिने अॕवाॕर्ड व शासनाचा सर्वोत्तम संगीतकार असे अॕवाॕर्ड मिळवुन देणारा चित्रपट 'पिकुली' सिनेमा कसा मिळाला ?
👉 याचे श्रेय मी आमचे दुसरे सहकारी चित्रपटाचे निर्माते सर्जेराव माने, दिग्दर्शक मनोज नार्वेकर, कथा पटकथा व संवाद नंदा आचरेकर कार्यकारी निर्माते संजय पाटील यांचे मार्गदर्शन व त्यांचेमुळेच या चित्रपटातील गीतांसाठी संगीत देण्याची संधी मिळाली, मानाचे पुरस्कार ही मिळाले.
👉 अजुन कोण कोणते अल्बम चित्रपट केलेस ?
आत्तापर्यंत अनेक अल्बम्स व चित्रपटास संगित दिले. पैकी मुंगळा, एक मराठा लाख मराठा जिव्हारी, हे चित्रपट व अनेक अल्बम प्रसिध्द झाले आहेत. सध्याची आघाडीची संजय पाटील दिग्दर्शित वेब मालीका ' शोध सावल्यांचा' याचे ही संगीत मीच केलेय.
येत्या रविवारी 'गण्याने पोरगी पटवली' हे गीत युट्युब वर प्रकाशित होत आहे.या गीताला मीच संगीत दिल असुन हे गीत प्रमोद कदम यांनी लिहील व गायलं असून या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन माणिक बर्गे यांनी केले असून हे गाणं चला हवा येऊन द्या फेम रोहित चव्हाण आणि दिशा पॉल यांच्यावर चित्रित झालं आहे गण्याने पोरगी पटवली हे गाणं प्रमोद अतुल या 'प्रमोद अतुल' या youtube चॕनेल वर रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 प्रदर्शित होत आहे. या गीतालाही आपण भरभरुन प्रेम द्याव असं आवाहन ही संगीतकार अतुल लोहार यांनी केले आहे.
संगीत क्षेत्रात पाटण तालुक्याच नावं रोषन करणा-या, ग्रामीण भागात राहूनही चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवणा-या अतुल ला मी पुढील गीतासाठी शुभेच्छा देत निरोप घेतला.


0 टिप्पण्या