Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'आई कुठे काय करते' या मालीकेतील गौरीचा अपघात..

मुंबई - संजय डुबल  - 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय  मालिके मधील 'गौरी' ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिचा नुकताच दुचाकी अपघात झाला . 
   अपघातात गौरीच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. ज्यात गौरीच्या स्कुटीचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे.    गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने  गौरी जात असलेल्या मार्गावर, रॅश ड्रायव्हिंग करत उलट मार्गाने येत, त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. त्यामुळे तिची स्कुटी रस्त्यावरच स्लीप झाली. गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे,  पुढील तीन आठवडे गौरी सक्तीच्या रजेवर आहे. आई कुठे काय करते, मालिकेतील गौरी आणि यश यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लोकप्रिय आहे. या अपघातामुळे पुढील तीन आठवडे तरी गौरी मालिकेत दिसणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement