Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


गोरेगाव फिल्मसीटीत भीषन आग लागल्याने सेट जळुन खाक.

मुंबई : संजय डुबल - दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव ( फिल्म सिटी) मध्ये भीषण आग लागली.
      फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. 
       दुपारी साडेचार वाजता या सेट ला आग लागली.  गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटला ही आग लागली. कलाकारांना बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरी काही कलावंत तंत्रज्ञ आत अडकले असल्याची भिती व्यक्त होत आहे. आगीत संपुर्ण सेट जळुन खाक झाल्याने. निर्मात्यांस मोठा आर्थिक फटका बसला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 
   आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 'तेरी मेरी दुरीयाँ' व 'अजुनी' या मालीकेच्या सेट ला ही आगीच्या झळा बसल्या आहेत.
   आगीचे कारण समजु शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement