Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'बाळगंगा रंगभूमी' ची पनवेल येथे शाखा सुरू, पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. चंद्रकांत मढवी यांची बहुमताने निवड.

.              आठवणींच्या च्या झुल्यावर.....
    अॕड. प्रा. चंद्रकांत मढवी यांचे अभिनंदन     करताना सु. बा. सरपडवळ व राम सारंग.

पनवेल - संजय डुबल
       नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मढवी यांचे अभिनंदन करताना सरपडवळ व राम सारंग.

      प्रा. चंद्रकांत मढवी यांचे अभिनंदन  करताना सौ. सरपडवळ व इतर मान्यवर...

पनवेल - संजय डुबल
- 'बाळगंगा पडवणे श्रमसंघ" - (मूळ- मातृसंस्था) 'पुरस्कृत' "बाळगंगा कामगार रंगभूमी" आयोजित पनवेल येथे शैक्षणिक कलावंतांचा मेळावा आणि 'बाळगंगा रंगभूमी' पनवेल शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड मातृसंस्थेच्या अधिपत्याखाली 'कार्याध्यक्ष' - सु. बा. सरपडवळ ( नाटककार / नाट्यसमीक्षक) यांनी सदर पनवेल येथील जेष्ठ कनिष्ठ कलावंतांची विविध पदांसाठी नेमणूक केली. आणि  प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार राम सारंग (नाट्य दिग्दर्शक) यांनी सन्मानपूर्वक यथोचित आदर व्यक्त केले तेव्हा 'बाळगंगा रंगभूमी' चे अध्यक्षपदी  प्रा. चंद्रकांत मढवी सर यांची
  सु. बा सरपडवळ यांचे अभिनंदन करताना नवनिर्वाचित पदाधिकारी..
      कार्याध्यक्ष पदी नाटककार व नाट्यसमिक्षक सु. बा सरपडवळ यांची, कार्य सचिव पदी कविलेश सुनिलदत्त सरपडवळ (कला दिग्दर्शक) यांची, सल्लागार प्रमुख पदी राम सारंग ( नाट्य दिग्दर्शक  व कलावंत) यांची, संघटक प्रमुख अभिलेश सुनिलदत्त सरपडवळ (संगीतकार व कलावंत) यांची, उपाध्यक्ष पदी भास्कर पाटील, व महेंद्र शहाणे यांची, खजिनदार पदी रमाकांत गमरे यांची, उपखजिनदार पदी यशोधन धोंडीदे यांची, सौ कवितांजली सरपडवळ यांची सल्लागार पदी, महिला संघटक पदी सौ. शर्मिला धोंडीदे यांची तर उपमहिला संघटक पदी गितिका पाटील (माई ) यांच्या बहुमताने निवडी करण्यात आल्या.
      यावेळी चंद्रकांत मढवी यांनी उपस्थित प्रत्येक  सदस्यांना आपल्या कथा आणि कादंबऱ्यांच्या प्रती भेट म्हणून दिल्या व आपल्या अनेक कवितांनी उपस्थितांची मन जिंकली तेव्हा बहु गर्दीत टाळ्यांच्या गजरात सर्वांनी आनंद व्यक्त केले. 
       बाहेर पाऊस बरसला आणि आत हॉलमध्ये आठवणींच्या झुल्यावर मनमोर पिसारा फुलवून थुई थुई नाचावा तसा कार्यक्रमाचा उत्साह वाढत गेला....
पुण्याचा कलावंत - विजयकुमार गायकवाड यांचा सत्कार करताना नाटककार - भास्कर पाटील, नाट्यदिग्दर्शक - राम सारंग मध्येभागी विजयकुमार गायकवाड आणि बाळगंगा रंगभूमी चे अध्यक्ष - ॲंड. प्रा. चंद्रकांत मढवी सर व  उपाध्यक्ष महेंद्र शहाणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement