Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण गुरेघर येथे गोळीबारात दोन ठार तर एक गंभीर जखमी.

       मयत श्रीऱग जाधव व सतीश सावंत
         पाटण - पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर  विभागात, रविवारी रात्री 9 च्या सुमारास, ठाणे जिल्ह्याचे माजी नगरसेवक मदन कदम (मल्हारपेठ) याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांवर गोळीबार केला.                   संशयित आरोपी मदन कदम

    या गोळीबारात 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण जखमी झाला आहे. यामुळे पाटण तालुक्यात मोरणा गुरेघर परिसरात खळबळ उडाली असुन. दरम्यान मदन कदम याला पाटण पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत ची सविस्तर माहिती अशी की, पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मदन कदम याने गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव (वय ४५), सतिश सावंत (३०) हे 2 जण जागीच ठार झाले. तर प्रकाश जाधव (४२) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. 
    गुरेघर येथे मदन कदम याचा शेती फार्म असुन. काही जनांबरोबर जमिनीवरुन वादावादी होऊन 4 दिवसांपुर्वीच पाटण पोलीस स्टेशन येथे फिर्यादही  दाखल झाली होती.

      दरम्यान सातारा जिल्याचे पोलीस प्रमुख समीर शेख, सहाय्यक एसपी बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलिस निरीक्षक विकास पाडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
     दरम्यान दोन्ही मृतदेहांचे ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.      
       मृतांच्या नातेवाईकांनी पाटण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश मात्र  मन  हेलावून टाकणारा होता.
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement