Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबई मालाड, आप्पापाडा येथील आगीत पाटण तालुक्यातील 60 चाकरमान्यांची घरे जळाली. राज्यउत्पादन शुल्क मंत्री शंभुराजेची जळीतग्रस्तांना तातडीने मदत...

मुंबई - संजय डुबल - मालाड आप्पापाडा झोपडपट्टीत येथे लागलेल्या भीषन आगीत, पाटण तालुक्यातील जवळपास 60 कुंटुंबांची घरे जळाली.  
जळीतग्रस्तांना उत्पादनशुल्क मंत्री शंभुराजे देसाईंनी केली तातडीने मदत...
   मालाड आप्पापाडा परिसरात लागलेल्या भीषन आगीत मुळचे पाटण तालुक्यातील जवळपास 60 चाकरमान्यांची घरे लागलेल्या आगीत जळुन खाक झाली असुन. त्यांचे सर्व घरे, संसार उपयोगी साहीत्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे सर्वच्या सर्व साहीत्य जळाल्याने कुटुंबे उघड्यावर आली. 
  तालुक्यातीला अनेक कुटुंबांवर ओढावलेल्या प्रसंगाच गांभिर्य शंभुराजे देसाईंचे कार्यकर्ते गजानन पड्याळ यांनी शंभुराजे देसाईंच्या लक्षात आणुन देताच. 
   अधिवेशनात व्यस्त असतानाही विषेश लक्ष घालत सविस्तर माहीती घेऊन संबंधीताना शासकिय पातळीवर जिल्हाधिकारी तसेच संबधितांना मदती संदर्भात योग्य सुचना दिल्या.
     तसेच मंत्री शंभुराज देसाईंचे कार्यकर्ते संजय जाधव, अरविंद गुजर,  जगन्नाथ कदम,व स्थानिक रहिवाशी यांचे मदतीने सर्वांना रेशनिंग, स्वयंपाकाची भांडी, ब्लँकेट,  कपडे इत्यादी साहीत्याचे वाटप करण्यात आलं. 
    पाटण तालुक्यातील सर्व जळीतग्रस्तांना लवकरच आवश्यक ती सर्व मदत मिळेल अस आश्वासान ही मंत्री शंभुराजे देसाईंनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement