Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अडूळच्या डाॅ.रोहित केंडेचा आदर्श तरुणांनी घ्यावा- यशराज देसाई

अडूळच्या डाॅ.रोहित केंडेचा आदर्श तरुणांनी घ्यावा- यशराज देसाई

संजय डुबल- आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-        अडूळ, तालुका पाटण,जि. सातारा येथील डाॕ. रोहित केंडे यांनी ध्येय, प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुले यशाची शिखरे गाठू शकतात हे आज डॉक्टर यांनी सिद्ध केले आहे. ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशाने अडूळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉक्टर रोहित केंडे यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे गौरवोद्गार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी काढले, ते डॉ.रोहित केंडे यांच्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.
डाॅ.रोहित केंडे हे मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे यांचे चिरंजीव होत. डॉ.रोहित केंडे याने नुकतीच M.S.(नेत्ररोग तज्ञ)डिग्री प्राप्त केली, त्याबद्दल त्यांचा यशराज देसाई व अन्य मान्यवर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
        डाॅ.रोहित यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिवांजली इंग्लिश मीडियम स्कूल नाडे नवारस्ता, अकरावी एसजीएम कॉलेज कराड, बारावी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे झाले. 12वी सायन्स नंतर वैद्यकीय MH CET परीक्षेत  कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवून M.B.B.S वैद्यकीय शिक्षण लोकमान्य टिळक  वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथे पूर्ण केले. तर पुढील पीजी चे शिक्षण  नीट परीक्षा द्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे प्रवेश मिळवून,  नेत्र शल्य चिकित्सा M.S डिग्री प्रथम श्रेणी प्राप्त केली. 
      त्याबद्दल मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा, नामदार शंभूराज देसाई साहेब यांचे स्वीय सहाय्यक रवी साळुंखे, रवी तावरे, विवेक भिसे, सागर चव्हाण समिती गटशिक्षणधिकारी सौ. दीपा बोरकर, शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका अध्यक्ष विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे संचालक धनाजी केंडे, नाडेचे माजी सरपंच विष्णू पवार, येराड हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार शिर्के, सुरेश शिकेॅ, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव श्री नथुराम कुंभार, शिवशंभो दूध संघाचे संचालक सर्जेराव शिर्के, ITI प्राचार्य दौलतनगरचे श्री गणेश सत्रे,भैरवनाथ सहकारी दूध डेरीचे चेअरमन कृष्णत शिर्के, माजी केंद्रप्रमुख शिवाजी शिर्के, अडूळ गावठाणचे माजी सरपंच जयवंत केंडे, हनुमान विकास सेवा सोसायटीचे संचालक अशोक केंडे, संचालक गणपतराव शिकेॅ अडूळगावातील युवक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी  प्रत्यक्ष भेटून फोन, व्हाट्सअप ,फेसबुक द्वारे डॉ.रोहितचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement