Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


" करून गेलो गाव " ची घोडदौड " !

" लक्षवेधी रंगभूमी वरून......"
       सु. बा. सरपडवळ ( नाट्यसमीक्षक )

.     " करून गेलो गाव " ची घोडदौड, "   हास्याचा बहु कारंजा - भाऊ कदम आणि ओंकार भोजने ...
                  संग्राहीत छायाचित्र
      राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटर्स  या नाट्य संस्थेचे पुनर्जीवित नाटक  " करून गेलो गाव " हे मालवणी मिश्रित मराठी नाटक अलीकडेच मोठ्या दिमाखात रंगभूमीवर रूजू झालं आहे  ! 
       हे नाटक काही वर्षांपूर्वी सिने दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी मराठी रंगभूमीवर सादर केले होते आणि त्यांचे हजारो प्रयोग सादर झाले होते . त्यात वैभव मांगले अभिनेता भाऊ कदम सोबत प्रमुख भूमिकेत काम  करत होता परंतु काही अडचणी मुळे वैभव मांगले यांनी नाटकात काम करणे सोडले आणि नाटक बंद पडले परंतु निर्माता राहुल भंडारे यांनी ओंकार भोजने याला घेऊन पुन्हा भाऊ कदम सह " करून गेलो गाव " हे नाटक पुन्हा पुनर्जिवीत करून रंगभूमीवर आणले आणि आज ते पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त जोमात नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहात सादर होत आहे ! यात ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांची जुगलबंदी पाहताना खूप मजा येते.... 
                 संग्राहीत छायाचित्र
 खर तर " करून गेलो गाव " हे नाटक म्हणजे नाटककार -  गंगाराम गवाणकर यांच्या   " वस्त्रहरण " या लोकप्रिय नाटकाची झेरॉक्स कॉपी म्हणता येईल. कारण वस्त्रहरण हे मच्छिंद्र कांबळी (बाबूजी ) यांनी प्युअर मालवणी मध्ये गाजवले होते आणि " करून गेलो गाव " हे मध्य मालवणीत आहे,अर्थात मिश्रीत. " करून गेलो गाव " हे नाटक लेखक / दिग्दर्शक  -  राजेश देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून निर्माण केले आहे तरी दोन्ही नाटकांचे परस्पर वेगळेपण आहे! तरी नाट्यरसिक प्रेक्षकांनी हे नाटक आवर्जून पहावे असे माझे स्पष्ट मत आहे  ! 
                    संग्राहीत छायाचित्र
   नाट्यसमीक्षक सु. बा. सरपडवळ व भाऊ कदम.
       संपादक संजय डुबल व भाऊ कदम
      
     - सु .बा. सरपडवळ, नाट्यसमीक्षक
 
         अभिनेता भाऊ कदम यांची मुलाखात पाहण्यास सोबतच्या मुळ बातमी पत्रातील युट्युब लिंक वर क्लिक करा.. 
     अथवा युट्युब वर CINE EXPERT खालील लोगो असलेल्या चॕनेल ला सर्च करूनही पाहु शकता...

    छायाचित्रण व संकलन - संजय डुबल

      नाट्यमल्हार या कार्यक्रम प्रसंगी भाऊ कदम व ओंकार भोजने यांनी 'करून गेलो गाव' या नाटकातील काही प्रसंग सादर केले होते, त्या वेळी 
    नाट्यसमीक्षक - सु. बा. सरपडवळ यांनी टिपलेले काही क्षण होते.
   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement