Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबई काँग्रेस पुन्हा अॕक्शनमध्ये!- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या १५० कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश.- मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाचं यश...

मुंबई काँग्रेस पुन्हा अॕक्शनमध्ये!
- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या १५० कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश.
- मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाचं यश...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - संजय डुबल - केंद्रात २०१४ ला नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून मुंबई काँग्रेसला लागलेल्या गळती आता थांबण्याची चिह्न आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी रिपब्लिकन युथ या पक्षाच्या १००  ते १५० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे मुंबई काँग्रेसला अधिक बळकटी मिळाल्याची प्रतिक्रिया आ. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी असल्याचे चित्र रंगवण्यात आले होते. त्यातच काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मुंबई काँग्रेसच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, या सगळ्याला उत्तर देत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या विस्तारावर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून आता स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाच्या १०० ते १५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आ. गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे यांचं निधन झाल्यानंतर पक्षाला मरगळ आली आहे. संविधानाच्या मार्गावर चालणाऱ्या काँग्रेसशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही, अशी भावना स्वा. रि. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली.
संविधानाच्या मार्गावर चालणारा आणि याच मार्गाने देशाची प्रगती करू इच्छिणारा एक मोठा वर्ग आजही आहे आणि तो काँग्रेसकडे अपेक्षेने बघतो, हे आजच्या पक्षप्रवेशानंतर सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया आ. गायकवाड यांनी दिली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस आणखी घराघरांत पोहोचली. आम्हीही त्यांच्याच मार्गावर पाऊल टाकून पक्षाचे विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करत आहोत. हे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी होणं, ही आमच्या कामाची पोचपावती आहे, असंही त्या म्हणाल्या
advertisment

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement