Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


खुन करुन तब्बल ३६ वर्षे फरारी असलेल्या आरोपीस अखेर पोलीसांनी पकडले. कराड पोलिसांची कामगीरी...

कराड :आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह-   कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोव्हेंबर १९८७ मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल ३६ वर्षे परागंदा इसमास शिताफीने पकडण्यात आले आहे. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलिसात दाखल होता. आणि त्यातील आरोपी लाला तेली हा गुन्हा घडल्यापासून ३६ वर्षे फरार होता.

लाला सिध्दाम तेली (रा. मनव, ता. कराड) असे या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी की. मनव येथील बाळू सरगर, दत्तू सरगर वगैरे यांनी गावातीलच भीमराव सिध्दाम तेली सन १९८३ मध्ये खून केला होता. या खुनाच्या कारणावरून लाला सिध्दाम तेली, संपत सिध्दाम तेली, महादेव सिध्दाम तेली व दत्तू आण्णा तेली (सर्व रा. मनव) यांनी पाल-खंडोबा (ता. कराड) दत्तू ज्ञानु यालमारे यांचा कोयता, कुऱ्हाड या सारख्या घातक हत्याराने निर्घुण खून केला होता. 

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कराडमध्ये बंदोबस्तात असताना, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना खबरीकडून लाला तेली हा मनव गावी आपल्या घरी येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार बापू बांगर यांच्या सूचनेवरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन शेळके, फौजदार विश्वास कडव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून लाला तेली यास काल गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरातून लाला यास शिताफीने पकडले.          आणि उंब्रज पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई फत्ते केल्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक बापू बांगर यांनी शेळके व कडव यांच्या नेतृत्वखालील पथकाचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement