Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


*पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पाटण येथे शेतकऱ्यांचा विराट मोर्चा!*

पाटण.प्रतिनिधी. (चंद्रकांत
 सुतार)-  सह्याद्री व्याग्र प्रकल्प, ईको सेन्सेटिव्ह झोन, कोयना अभयारण्य, पश्चिम घाट प्रकल्प,आणी कोन्झर्वेशन झोन पाटण तालुक्याचे मानगुटीवर बसवन्यात आले आहेत. या जाचक झोन मधुन तालुक्याची मुक्तता करावी. शेती व शेतकरी वाचवण्यासाठी तसेच पाटण तालुक्यात वन्य प्राण्यामुंळे (रानगवे) शेतीचे होत असलेले मोठ्या प्रमाणावर नुकसान. व झालेल्या नुकसानीची भरपायी व संरक्षण मिळणे बाबत सदर विराट मोर्चा काढण्यात आला. 
      या मोर्चास  शासनाकडुन  ना कोणी पैसे दिले, ना कोणी गाडी खर्च दिला, ना कोणी जेवण-नाष्टा दिला तरीही हजारोंच्या संख्येने पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उतरली होती. कोणत्याही स्वरूपाचे आमिष दाखवून आणलेली ही गर्दी नव्हती.या गर्दीत मोठ्या संख्येने युवक, युवती, वयोवृद्धांपासून अगदी ४ महिन्यांच तान्हं बाळ घेऊन आलेली आई सुद्धा होती. सर्वांचा उद्देश एकच होता आपल्यावर होत असलेला अन्याय थांबावा. आम्हीं पत्रकार असल्याने आमचं पाटण तालुक्यात होत असलेल्या सर्व राजकीय कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलनांवर बारकाईने लक्ष असतं. तसं पहायला गेलं तर हा मोर्चा पक्ष, संघटना, राजकारण, गट-तट विरहितच होता. परंतु जी गर्दी या मोर्चामध्ये दिसत होती ती कोणत्याही ठिकाणी दिसली नाही. अगदी पाटणचे विद्यमान आमदार व राज्याचे मंत्री शंभूराज देसाईंनी पाटण शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या भुमिपूजनांच्या समारंभासही हातच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक येत होती. मंत्री साहेबांचे आगमन झाले तरी लोकांचा पत्ता नसायचा. साहेबांचे आगमन झाले की आजुबाजुच्या परिसरातील लोकांना जबरदस्तीने आणुन बसवण्यासाठी साहेबांच्या पुढाऱ्यांना कसरत करावी लागत होती. महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक समारंभास शाहकारी व मांसाहारी जेवणाची सोयही असायची पण तरीही लोकांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती.  
      तुम्हांला वाटेल मी एका बाजूला म्हणतोय की मोर्चा पक्ष विरहित होता आणि दूसऱ्या बाजूला असेही म्हणत आहे की या मोर्चाच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील जनतेने सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्व स्वीकारले.असे का ? याच उत्तर तुम्हांला  आता मिळेल, हा  मोर्चा १२ च्या सुमारास बचत भवन पाटण येथून सुरु झाला. हा मोर्चा पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीने काढण्यात आला होता परंतु जसजसा मोर्चा पुढं सरकत गेला तसं तसं या मोर्चाचे नेतृत्व आपोआपच सत्यजितसिंह यांच्याकडे गेले. मोर्चातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या मागण्यांच्या घोषणांबरोबरच '५० खोके एकदम ओके' व सत्यजितसिंह यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही होऊ लागली. काही ठिकाणी सरकार व शंभूराज देसाई यांच्या विरोधातही घोषणाबाजी झाली. खऱ्या अर्थाने या मोर्चाने पाटण तालुक्यातील जनतेच्या मनात शंभूराज देसाईंच्या विरोधात असलेल्या रागाला आज वाट करुन दिली. शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यापासून त्यांच्या विरोधात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, त्यांच्या या निर्णयाविरोधात तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांपासून सर्वच लोकांच्या मनात कटुता निर्माण झाली होती. ती आज सर्वांसमोर आली. 
       गेल्या काही महिन्यांमध्ये शंभूराज देसाई जरी आपण राज्य पातळीवरील एक मोठा नेता झालो हे भासवण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असले तरीही पाटण तालुक्यातील विकास कामांची ढासळलेली गुणवत्ता, दिवसेंदिवस टक्केवारीचा वाढत असलेला टक्का,  वाढलेली बेरोजगारी  आणि त्या नैराश्यातून युवकांच्या वाढलेल्या आत्महत्या, युवा पिढीमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, वाढलेला भ्रष्टाचार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असलेली एक वेगळीच दहशत यांनी संपूर्ण पाटण तालुका पोखरून टाकला आहे. आजच उदाहरण घ्या आज एकाच दिवशी पाटण तालुक्यात ४ आंदोलने चालू होती..पहिले कोयनानगर येथे गेली १०-१५ दिवस सुरु असलेले धरणग्रस्तांचे आंदोलन, दुसरे गोकुळ येथे सुरु असलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, तिसरे आंदोलन पेन्शन योजनेसाठी सर्व सरकारी कर्मचारी पाटण पंचायत समिती येथे करत होते व चौथे आंदोलन म्हणजे हा शेतकऱ्यांचा विराट मोर्चा.या सर्व आंदोलनांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चारही आंदोलनाला सत्यजितसिंह पाटणकर यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले पण ज्या शंभूराज देसाईंना या लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले त्यांनी या चार मधील एकाही आंदोलनाला साधी भेटही दिली नाही. शंभूराज देसाई आज मंत्री झाले म्हणून आता फक्त विरोधकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. ते स्वतः ला आता भावी मुख्यमंत्री समजू लागले आहेत. शिवाय हल्ली त्यांचा मुक्कामही साताऱ्यातच आणि लक्ष साताऱ्यातील भिंतींवरच जास्त आहे. याउलट सत्यजितसिंह मात्र पाटण तालुक्यातील गावागावात, घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या स्वभावामुळे ते लोकांनाही आपलंस करत आहेत.  माता-भगिनी त्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पाहत आहेत. थोडक्यात काय तर सत्यजितसिंह आता शंभूराज देसाईंच्या विरोधात लोकांसाठी एक चांगला व खंबीर पर्याय म्हणून पुढे आले आहेत.
            आजच्या मोर्चाच्या शेवटी जेव्हा निवेदन देण्याचा प्रसंग आला तेंव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी विनाकारणच विलंब केला असेच म्हणावे लागेल. कारण हाजारो लोकं जेव्हा एवढ्या कडक उन्हात पायी चालत येऊन तास दोन तास बाहेर थांबतात आणि ए.सी. मध्ये बसलेले हे अधिकारी संवेदना शुन्य असल्यासारखे कसे काय स्वतः च्या कक्षात बसून राहू शकतात ? कदाचित मंत्री साहेबांच्या कामांचा बोजाही त्यांच्यावर असु शकतो पण एक निवेदन घेऊन चार शब्द बोलायला फक्त ५ मिनिटांचा वेळ लागला असता.    सत्यजितसिंहांनी येथे आक्रमक भूमिका घेत फक्त बॅरीगेट्सच धुडकावले नाहीत तर येणाऱ्या आमदारकीचा दरवाजाच उघडला आहे. सत्यजितसिंहांचा तो व्हिडिओ बघता बघता संबंध पाटण तालुक्यासह  महाराष्ट्रात व्हायरल झाला. सत्यजितसिंहांचा हा रुद्र अवतार बघून त्यांचे कार्यकर्तेही आवाक् झाले क्षणभर त्यांनाही कळाले नाही कि नेमके घडतंय काय ? क्षणभर मी ही संभ्रमात पडलो कारण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरणारा सोज्वळ सत्यजितसिंह पाटणकर मी पाहिला होता. आणि आज त्याच डोळ्यांनी हा जनतेसाठी रागाने लाल बुंद झालेला सत्यजितसिंह मी पाहत होतो. ते लाल बुंद सत्यजितसिंह मला दिवसाची सुरुवात करणाऱ्या लाल बुंद सुर्यासारखे भासत होते. कदाचित हा लाल बुंद सत्यजितसिंह म्हणजे पाटण तालुक्यात येणारा नवा राजकीय सुर्यच असावा.           सत्यजितसिंहांनी आज संपूर्ण मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाच्या मनात जागा निर्माण केली.  जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते या मोर्चाच्या अगोदर मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं भावनिक वातावरण निर्माण करण्यात आले होते. सोशल मिडियाचा एवढा प्रभावी वापर पहिल्यांदाच जिल्ह्यातील एखाद्या आंदोलनात मी पाहिला आहे. जर हे वातावरण निर्माण झाले नसते तर कदाचित एवढ्या उन्हात महिला, युवक, शेतकरी आपली हातातील कामे ठेवून या मोर्चामध्ये सामिल झाले नसते. यासाठी पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सत्यजितसिंह यांनी आता मागे वळून पाहू नये फक्त एवढंच शेवटी सांगेन.

मोर्चाचा video पाहण्यास खालील youtube लिंक वर जाऊन पहा...
https://youtu.be/piqsOAO8mb4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement