Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

संजय डुबल - कोल्हापूर - मराठी  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.                            कोल्हापूरच्या कळंबा शिवप्रभू नगर येथील निवास स्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्य यात्रेस सुरुवात होणार आहे.
      भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
 त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, माहेरची साडी अशा जवळपास ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. 
      १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
     भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना 'चित्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
   चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय असत. जयप्रभा, शालीनी स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यातही ते अग्रभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement