Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अभिनेत्री गौरी सावंत यांना 'साई कलारत्न समाजभूषण' पुरस्कार जाहीर. गौरी पाटण तालुक्यातील खळे गावातील शिद्रुकवाडी येथील.

संजय डुबल - मुंबई.
   कला क्षेत्रांत अभिनेत्री म्हणुन स्वताची ओळख निर्माण केलेल्या गौरी सावंत यांना 'ओम साई विकास प्रतिष्ठान' आणि 'बीबीसी फिल्म प्रोडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा "साई कलारत्न समाजभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.      
       ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम संसारे यांनी त्यांचे निवडीचे पत्र दिले आहे. अभिनेत्री गौरी सावंत ह्या मुळच्या सातारा जिल्ह्यातील  पाटण तालुक्यातील खळे येथील शिद्रुकवाडी च्या असून कलाक्षेत्रात वाव मिळावा म्हणून त्या पुणे येथे असतात.
     अनेक संकटाना आव्हान देत आणि परिस्थितीचा सामना करत त्यांनी कला क्षेत्रात कलेच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून स्वताचे अस्तीत्व निर्माण  केले आहे, 
        शिर्डी येथे दि. १ मे रोजी 'महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून 'साई'च्या नावाने दिला जाणारा "साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे. 
    पुरस्कार गौरी सावंत यांना जाहिर झाल्याने  भारतीय लहुजी सेनेचे नगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे, प्रवरा संगमचे माजी सरपंच सुनिल राव बाकलीवाल, शिवसेनेचे संघटक अंबादास राजे लष्करे, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, सिने अभिनेत्री वंदना गव्हाणे, फिल्म डायरेक्टर पांडुरंग गोरे तसेच प्रेम चित्रपटातील कलाकारांनी अभिनंदन केले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement