Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मेंढोशी येथे अभिनव उपक्रम... गावांना संविधान प्रतीचे करणार वाटप...

पाटण - संजय डुबल - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा १३२ वा जयंती उत्सव मेंढोशी ता.पाटण येथे दि. 15 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. 
 जयंतीचे औचित्य साधत केरा पंचक्रोशितील सूरुल,बिबी,साखरी, मेंढोशी,केरळ,मणदुरे व निवकने या गावातील ग्रामपंचायतींना 'भारतीय संविधानाची' प्रत प्रदान करण्यात येणार आहे. 
     जयंती उत्सवाच्या विविध उपक्रमा बरोबरच   यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचनही करण्यात येणार असुन,
      या अभिनव उपक्रमामुळे राजकीय, सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रातून मेंढोशी येथील डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
      सिद्धार्थ सत्वधीर यांनी या बाबत माहिती देत पाटण तालुक्यातील बहुसंख्य नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement