Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आणी पडदा उघडला...

.        आणि पडदा उघडला....
मुंबई - सु. बा सरपडवळ - 
    यशवंत नाट्य मंदीर मागील जवळपास पाच वर्षे बंद होते. परंतु यंदाच्या नाट्य परिषदे च्या निवडणुकीत प्रशांत दामले निवडून आले आणि नादुरुस्त थिएटर लवकरच दुरुस्त करून " यशवंतनाट्य मंदीर " चा पडदा उघडला तो थोर नाटककार कैलासवासी - गो.ब देवल यांच्या स्मृतिदिनी १४ जून रोजी !
    
        जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना रंगमंचावर प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे, प्रेमानंद गज्वी, राहुल शेवाळे, अभिनेते- मोहन जोशी, उदयजी सामंत, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक - अजित भुरे, अतुल परचुरे, संजय मोने, अभिनेत्री - वंदना गुप्ते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष- अभिनेता - प्रशांत दामले , भाऊसाहेब भोईर, विजय चौगुले, सुशांत शेलार, नरेश गडकर, अशोक हांडे, शशी प्रभु,आशिष शेलार, गिरीश गांधी, सतीश लोटके व इतर पदाधिकारी, रंगकर्मी यांच्या उपस्थितीत रंगमंचावर झाडीपट्टी रंगभूमीचे रंगकर्मी - डॉ. परशुराम खुणे,  रंगभूमी साठी सक्रिय कार्यरत असलेले - वामन पंडित           
 ( रंगवाचा ) चे संपादक यांचा हि सन्मानपूर्वझक सत्कार करण्यात आला. 
       अभिनेते मोहन जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना रंगमंच कामगारांचे आभार मानले ते आहेत म्हणून मी खरा ओळख ला गेलो अस बोलून हात जोडून थांबले! 
         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० वे नाट्य संमेलन भव्यदिव्य व्हावे यासाठी काही ही कमी पडू देणार नाही असे आश्वासन देऊन "!यशवंत " नाट्य संकुलामध्ये विस्तार करण्यासाठी १० कोटी देण्याचे जाहीर केले. 
.      सदर समारंभाचे छान असे सुत्रसंचालन  अभिनेता - विघ्नेश जोशी याने बारीकसारीक जागा हेरूण मस्त रंगतदार केले! 
                ✍️  - सु. बा. सरपडवळ, नाट्यसमीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement