Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'कस्टम पाॕईंट वेल्फेअर सोसायटी' चे वतीने मुंबईत 'सायकल मास्टर 2023' सायकल स्पर्धेचे आयोजन.


मुंबई - संजय डुबल - १५ आॕगस्ट, 'स्वातंत्र्य दिना' निमित्त  प्रभादेवी मुंबई येथील 'कस्टम पाॕइन्ट वेल्फेअर सोसायटी' या संस्थेचे वतीने सायकल मास्टर २०२३ स्पर्धेचे आयोजन केले आहे. 
      या स्पर्धेचा उपक्रम नविन बांदीवडेकर यांनी भारतीय बनावटीच्या सिंगल गियर ने सुरू केलेल्या व कस्टम पाॕइन्ट संथेच्या वतीने आयोजित सायकल स्पर्धेचे  हे ४३ वे वर्ष आहे. नवीन बांदीवडेकर यांनी सायकल सायकल स्पर्धेचा उपक्रमामुळे मुंबई तसेच महाराष्ट्राला राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवणारे सायकलपट्टू मिळाले आहेत याची माहीती अध्यक्ष योगेश मानकामे व संस्थेचे माजी सल्लागार माजी आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू जितेंद्र अडसुळे यांनी दिली.
     स्पर्धा मंगळवार दि. १५ आॕगस्ट रोजी सकाळी ८ वा संपन्न होणार आहे. 
यात पुरुष, महिला व कुमार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.       सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम पारीतोषिक म्हणुन देण्यात येईल. 
      पुरुष खुला गट (वन रेशो) भारतीय बनावटीची सायकल आवश्यक.
पुरुष खुला गट, पुरुष प्रोढ गट - ४० वर्षा वरील.
महिला खुला गट, १८ वर्षा वरील मुले, १४ वर्षा वरील मुले, व १० वर्षा वरील मुले, या सर्वांसाठी सर्व प्रकारच्या सायकलना प्रवेश (all made) उपलब्ध असेल. 
    प्रवेश अर्ज १० ते १३ आॕगस्ट पर्यंत सायंकाळी ७ ते ९.३० पर्यंत  स्विकारले जातील. 
      अधिक माहीती साठी ९८९२०८६५८३, ९३२२२८२७५०, ९२२०३७६१४१ या 
भ्रमनध्वनी वर संपर्क करण्याचे आवाहन याची माहीती अध्यक्ष योगेश मानकामे यांनी केले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement