Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी दमदार पाऊस. आज रेड अलर्ट जारी. कोयना धरण अपडेट.

संग्रहीत छायाचित्र 
संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज आॕनलाईन -
मुंबईत बुधवार दि. 26 जुलै रोजी सकाळपासुन दमदार पावसाने हजेरी लावली. तर. मुंबई शहर तसेच उपनगरात पावसाचा दिवसभर जोर होता.  
     पावसाचा जोर दुपार नंतर अधिकच वाढल्याने कांदीवली, अंधेरी सबवे,अंधेरी पश्चिम, मालाड, गोरेगाव आरे काॕलनी, वांद्रे,  किंग्ज सर्कल, भांडुप,  चेंबुर शेल काॕलनी, दादर टीटी , परळ' सायन गांधी मार्केट, धारावी, गोवंडी, माहिम, मानखुर्द येथील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडी झाली तसेच  वाहनधारकांची त्रेधा तीरपट उडाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे पंप सुरू केले होते. 
  काल नेमका २६ जुलै होता व दमदार पावसाच्या जोराने २६ जुलै २००५ ची आठवणीने नागरीकांना पुन्हा धडकी भरली.
     संततधार पावसाने मुंबई महानगरपाली केला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपेकी तुळशी, विहार व ताणसा तलाव ओसंडुन वाहु  लागले आहेत. 
              अतिवृष्ठीचा इशारा
रत्नागिरी मध्ये तुरळक ठिकाणी  तसेच
सातारा, पुणे घाट परीसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीच्या इशा-याने रेड अलर्ट देण्यात आला आहे. 
विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली याही जिल्ह्यातील  तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा तसेच विजेंचा कडकडाटही होऊ शकतो त्यामुळे या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
    नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसाळधार पावासाची शक्यता गृहीत धरून आज आॕरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

                कोयना धरण अपडैट
 दिनांक: 27/07/2023
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2123' 06" (647.243 मी)

 धरण साठवण:
 एकूण: 64.32 TMC (61.11%)

 आवक: 36,007 क्युसेक

 डिस्चार्ज
 KDPH: 1050 क्युसेक.
 कोयना नदीत *एकूण विसर्ग: 1050 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस: (दैनिक/संचयी)
 कोयना: 119/2459
 नवजा: १८९/३४६३
 महाबळेश्वर : १५४/३२५७

मुंबईतील पाऊस मिमी. 
सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत 
सांताक्रुझ - ७८.९
कुलाबा -  , १०३.४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement