Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


किसन गडदे संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित



किसन गडदे संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित

 किसन गडदे यांना पुरस्कार प्रदान करताना तुकारामशास्त्री महाराज मुंढे. समवेत रामेश्वर महाराज कोकाडे, समवेत वारकरी.

पाटण - प्रतिनिधी - चंद्रकांत सुतार
          पाटण येथील ज्ञानोजीराव साळुंखे विद्यालयाचे संगीत शिक्षक किसन गडदे यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने संगीतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
      पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे संगीत शिक्षक किसन गडदे यांना परळी वैजनाथ येथील ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने यंदाचा संगीतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. परळी तालुक्यातील
      बोधेगाव हे त्यांचे मूळगाव आहे. त्यांना लहानपासूनच संगीताची आवड जोपासत संगीतात विविध प्रकाराच्या कलागुणांना वाव देत स्वतः कलेत निष्णात होऊन इतरांना संगीताचे धडे देण्याचे काम केले. पाटण तालुक्यातही  गडदे येथील मुलांना घडविण्याचे काम करत आहेत. श्री. गडदे यांना मिळालेल्या या पुरस्काराने पाटणच्या संगीत क्षेत्रांत यापुढील काळात प्रगती होईल, असा विश्वास पाटण तालुका वारकरी परिषद व संघ परिवाराचे अध्यक्ष आकाशवाणी कीर्तनकार आनंदराव देसाई यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement