Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पोदार रुग्णालयाचा ८२ वा वर्धापन दिन संपन्न.....

पोदार रुग्णालयाचा ८२ वा वर्धापन दिन संपन्न.....
    

       श्री धन्वंतरी देवता पोदार रुग्णालय
अधिष्ठाता सौ. संपदा संत आणि  पत्रकार.  सु. बा, सरपडवळ वार्तालाभ घेताना...

मुंबई -  महादेवी आनंदीलाल पोदार रुग्णालय, पोदार आयुर्वेद संस्थेचा ऐतिहासिक सोहळा ६ जुलै २०२३ रोजी, ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम पोदार रुग्णालयात मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आले होते .

     महादेवी आनंदीलाल पोदार  रुग्णालयाची थोडक्यात माहिती इति सन १९४१ मध्ये महादेवी पोदार यांच्या स्मरणार्थ हे रुग्णालय सुरू झालेल्या भव्य, दिव्य, प्रशस्त, वास्तुला  ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वारसा लाभलेला आहे. तसेच वरळी व इतर अनेक दूरदूरच्या रुग्णांना अहोरात्र २४ तास सेवा देण्यासाठी वरळी मुंबई येथील पोदार  रुग्णालयाचा ०६ जुलै २०२३ रोजी संस्थेचा ८२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला, यानिमित्त आयुर्वेदाची देवता श्री धन्वंतरी देवतेचे अभिषेक व पूजन रुग्णालयाचे प्रथम महिला अधिष्ठाता सौ. संपदा संत मॕडम व श्री संदीप संत सर तसेच रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुश्रुत मुक्कावार व सौ. दिशा मुक्कावार यांच्या हस्ते करण्यात आले. दि. ०७ जुलै रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा  डॉ. श्रीकांत काकुडकर व सौ. डॉ काकूडकर यांच्या हस्ते संपन्न झाली.

रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुश्रुत मुक्कावार  यांचे कडुन माहीती घेताना सु. बा सरपडवळ. (नाट्यसमीक्षक)

रुग्णालय प्रशासन अधिकारी 
श्री. नरसू पाटील साहेब व  सु. बा. सरपडवळ भेट घेताना.
     यावेळी पोदार रुग्णालयाचे संस्थापक श्री पोदार यांचे प्रतिनिधी श्री आशिषजी यांना मानचिन्ह देऊन त्यांना सत्कारपूर्वक गौरवण्यात आले, त्या वेळी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले व अनेकांचे सत्कार घडवून आणले. त्यानंतर रुग्णालयातील  डॉक्टर युवक / युवतींनी  रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, नर्सेस, कर्मचारी व इतर चतुर्थ वर्ग कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी त्यांच्या विविध कलेचे प्रदर्शन आणि उत्तम सादरीकरण करून अतिशय सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रमातून रंगत आणली.

  
     या प्रसंगी वर्षभर मेहनत करणारे व रुग्णांना सेवा देणारे आदर्श कर्मचारी यांचा सन्मानपूर्वक स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
     यावेळी महाराष्ट्र राज्यव्यापी कर्मचारी संपामध्ये अतिशय सुंदररित्या साफसफाई करून रुग्णालयाची स्वच्छता व रुग्णसेवा केलेल्या अशा डॉ मेघराज आंदळे , डॉ नितीन काळे,  डॉ अभिजीत इच्चे, डॉ प्रतिक जोशी, डॉ अथिरा,    डॉ हरजीत रंगारी, डॉ वृषाली आवरशे, डॉ श्रुती फडतरे यांचाही सत्कार करण्यात आला. 
तसेच दिवस-रात्र उत्तम सेवा देणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
       
     यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मा. आमदार श्री सुनीलजी शिंदे, मा. संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, मा.अधिष्ठाता डॉ. संपदा संत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत मुक्कावार, सहाय्यक संचालक डॉ. निकेतन झोडपे, प्रशासन अधिकारी श्री. नरसू पाटील व श्री. अनिल बंदिष्टी, अधिसेविका सौ. मिरा शिरसाठ याशिवाय       डॉ. मनोज गायकवाड, डॉ. विजय उखळकर,  डॉ. लहानकर मॅडम, महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पठाण उपस्थित होते.
    डॉ. प्रज्ञा साबडे यांचे कौतुक करताना नाट्य समीक्षक सु. बा. सरपडवळ.

   कार्यक्रमाचे संचलन डॉ. प्रज्ञा साबडे यांनी उत्कृष्टरित्या केले.... या  कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी  पोदार रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

            सांस्कृतिक कार्यक्रमतील क्षणसहाय्यक संचालक डाॕ.झोडपें यांचे  अभिनंदन करताना पत्रकार                      सु. बा. सरपडवळ. 
             छायाचित्रे - संजय डुबल व 
  लेखन - सु. बा. सरपडवळ, नाट्यसमीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement