Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन..

संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाइव्ह.  पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. 

     .हृदय विकाराचा झटका तीव्र  झटक्याने त्यांचे निधन झालं. क्रिकेट , राजकारण आणि सिनेमा या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं.         माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तकं आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. ६ जून १९४३ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. तर मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली होती.

     इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.

     यादो की बारात’, ‘शिरीषासन’, ‘सिनेमाबाजी’, ‘मुद्दे आणि गुद्दे’, ‘चहाटळकी’, ‘सूर पारंब्या’, ‘कणेकरी’, ‘लगाव बत्ती’, ‘आसपास’, ‘मेतकूट’, ‘चित्ररुप’, ‘फिल्लमबाजी’, ‘कल्चर व्हल्चर’ या नावांनी ते स्तंभलेखन करत. ‘कधीही दारु न प्यायलेला बेवडा’ या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख आजही लोकांच्या स्मरणात आहे. तिरकस लिहणं आणि जोरकसपणे मुद्दे मांडणं हे त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य. 

      त्यांच्या ‘लगाव बत्ती’ कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता.

   रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

21 जुन रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाचे 82 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतीथी होते.व या वेळी मला त्यांचा सहवास लाभला. या निमित्ताने त्यांच्या खास शैलीतील किस्से ऐकता आले. अनुभवता आले. 

आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह चे वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली. 

संपादक - संजय डूबल

शिरीष कणेकर यांची काही पुस्तके 

  • इरसालकी
  • खटलं आणि खटला
  • गाये चला जा
  • गोतावळा
  • चापलूसकी
  • चापटपोळी
  • फटकेबाजी
  • लगाव बत्ती
  • सूरपारंब्या
  • चहाटळकी
  • साखरफुटाणे
  • रहस्यवल्ली l
  • मखलाशी
  • मनमुराद
  • डॉलरच्या देशा
  • एकला बोलो रे
  • माझी फिल्लमबाजी
  • यादोंकी बारात
  • पुन्हा यादों की बारात
  • गोली मार भेजे मे
  • वेचक शिरीष कणेकर
  • कटटा
  • मी माझं मला (आत्मचरित्र)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement