Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन... ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

          छायाचित्र - साभार 'झी मराठी'

मुंबई - संजय डुबल- मराठी रंगभूमी, मालिका, व चित्रपट क्षेत्रात गेली सात दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. 

   ठाणे येथे त्यांचेवर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणजोत मावळली, ते ८८ वर्षांचे होते.

      मराठी रंगभूमी मालिका, व व चित्रपट क्षेत्रात  सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. त्यांनी ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे. 

         मुळचे गुहागर येथील जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. तसेच ते ९७ व्या नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते.  

    ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. तसेच अनेक मालिका, मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी भुमिका साकारल्या.

      सौजन्या,  सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

    नुकत्याच संपन्न झालेल्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

त्यांचे पश्चात मुलगा कौस्तुभ,  मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे.

   उद्या मंगळावर दि. २५ जुलै रोजी त्यांचेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे निधनाने चित्रपटसृष्टी वर शोककळा पसरली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement