Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


गणपतीबाप्पाच्या सान्निध्यात रमले आमदारसाहेब...

गणपतीबाप्पाच्या सान्निध्यात रमले आमदारसाहेब...

    मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - संजय डुबल - 
                   आ. सत्यजीत तांबे
महाराष्ट्रात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव! गणरायांचं आगमन अगदी काही दिवसांवर आलं आहे आणि सगळ्याच शहरांमध्ये आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. या सणाच्या रंगात न्हाऊन निघायला सगळेच उत्सुक आहेत. याला आमदार सत्यजीत तांबे देखील अपवाद नाहीत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या, मूर्तीकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे बाहेर पडले आणि एका गणेशमूर्तींच्या दुकानात चक्क रमले.
वक्राकार सोंड, सुपासारखे कान, लंबोदर, शांत अनुभूती देणारे डोळे, हे गणपतीबाप्पाचं रूपडं लहानग्यांना तर भुरळ पाडतंच, पण मोठ्यांनाही खिळवून ठेवतं. हाच अनुभव आ. तांबे यांच्या या भेटीदरम्यान पुन्हा एकदा आला. दुकानात गेल्यानंतर तिथल्या विविध रूपांमधल्या गणेशमूर्तींनी आ. सत्यजीत तांबे यांना स्तिमित केलं. प्रत्येक मूर्तीजवळ जात दोन-चार मिनिटं थांबत त्यांनी सगळ्या मूर्ती बघून मूर्तीकारांचं कौतुक केलं. तसंच या मूर्ती कोणत्या मंडळांसाठी आहेत, याचीही माहिती घेतली. आगामी गणेशोत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा देत बऱ्याच वेळाने आमदारसाहेब तिथून बाहेर पडले.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement