Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


देव आनंद स्पेशल

मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -  देवआनंद
२६ सप्टेंबर १९२३ हा या हिरोचा वाढदिवस त्याला २६ सप्टेंबर २०२३ ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
त्याला वाहिलेली ही आदरांजली...
बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा आज (२६ सप्टेंबर) १०० वा वाढदिवस. 
   देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमधील गुरुदासपुरच्या एका सामान्य कुटुंबात झाला. सिनेसृष्टीत ६०वर्षांची कारकीर्द असणाऱ्या देव आनंद यांचा अभिनेता होण्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. 
      देव आनंद यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.  देव आनंद यांनी ५०-६०चं दशक आपल्या अभिनयाने प्रचंड गाजवलं. 
         यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.हे यांचे गाजलेले चित्रपट. 
देव ‌आनंद.....‌ हा पहिला रोमँटिक व प्रसन्न चेहऱ्याचा देखणा नायक! त्याच्या आधीचे किंवा बरोबरीचे बरेचसे नायक हे प्रेयसी साठी झुरत व त्यामध्ये रडगाणी म्हणायचे आणि कधी कधी मरायचे, पण देव आनंद बाबत असे क्वचित घडले. दुःखी गाणी हा त्या काळातला ट्रेंड होता आणि त्याप्रमाणे काही प्रमाणात तो अशी गाणी गायला, पण रडला मात्र कधीच नाही. खरं म्हणजे त्याला रडताच येत नव्हते. समजा असा एखादा प्रसंग आलाच, तर तो (मनोज कुमार प्रमाणे) पाठ फिरवायचा आणि डोळे पुसल्यासारखा परत नॉर्मल मध्ये येत असे.. पण रोमँटिक मूडमध्ये मात्र एकदम झकास! शम्मी कपूर सारखा तो धसमुसळ्या नव्हता. एखाद्या भ्रमराने (भुंगा) अलगद व सुंदर फुलातील रस घ्यावा परंतु त्या फुलाला धक्का देखील लागणार नाही याची काळजी घ्यायचा, ‌ त्याप्रमाणे देव  नायिकेभोवती हळूच पिंगा घालत असे आणि एकटा असेल तर बिनधास्त, बेफिकीर आपल्या मस्तीत शिट्टी वाजवत फिरणारा. "जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये" या गाण्याच्या प्रसंगी फिरतो तसा आपल्याच नादात खुश, ज्याला सुखदुःखाची पर्वा नसते , जे मिळेल ते आनंदात स्वीकार करणारा. "बात एक रात की" मध्ये "अकेला हू मैं" (रफी) "सोला साल", "हैं अपना दिल तो आवारा" (हेमंत कुमार) "हम दोनो" मधील "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" (रफी) - अशा गाण्यांमधून देवानंदच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू रंगवला गेला. त्याचे चालणे (सी आय डी) बोलणे सर्व अफलातून! 
नवकेतनच्या चित्रपटाच्या यशात गोल्डी (विजय आनंद) हा फार मोठा घटक.. असाधारण बुद्धिमत्ता अफलातून टेकिंग (विशेषतः गाण्यांचे) हे त्याच्या प्रत्येक सिनेमात सिद्ध होते.
"जॉनी मेरा नाम" , "ज्वेल थीफ" , "गाईड" , "तेरे मेरे सपने", "नौ दो ग्यारह" असे अनेक चित्रपट याचे उदाहरण "सचिन देव बर्मन" आणि "किशोर कुमार" हे दोघे देखील नवकेतनचे आधारस्तंभ. किशोर कुमार सचिन दा यांच्याकडे देव साठी गायला ती गाणी सर्वात सुंदर..
"नौ दो ग्यारह" मध्ये देव ची नायिका "कल्पना कार्तिक" होती. "हमसफर", "ऑंधीया हाऊस नंबर 44" , "टॅक्सी ड्रायव्हर" हे पती-पत्नी एकत्र होते.
"नौ दो ग्यारह" नंतर कल्पना कार्तिक ही कधीच पडद्यावर व इतरत्र दिसली नाही तिने फक्त आणि फक्त देव आनंद बरोबरच काम केले. 
असा हा चिरतरुण सदाबहार कलाकार तीन डिसेंबर रोजी हे जग सोडून निघून गेला..
साभार 
लेखक.
अनामिक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement