शिव उद्योग संघटनेचा उपक्रम : संपूर्ण महाराष्ट्रात शेण-गोमुत्र प्रॉडक्ट्स प्रकल्प उभारणी...
पुणे : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - ( संजय डुबल ) रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास यांचा संगम घडवून आणण्यासाठी शिव उद्योग संघटनाने भव्य उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आणि तालुक्यात गाईच्या शेण-गोमुत्रावर आधारित विविध प्रॉडक्ट्स तयार करणारे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
या प्रकल्पांतून गोमूत्र अर्क, फिनाईल, जैविक खत, अगरबत्ती, शेणाचे दिवे, शेणकाठ्या, बांधकाम साहित्य तसेच औषधी व कृषी क्षेत्रातील उपयोगी वस्तूंचे उत्पादन होणार आहे. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या गोवंश संसाधनांचा योग्य उपयोग करून स्थानिकांना रोजगार, महिलांना उद्योगधंद्यात संधी आणि शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद म्हणाले, “गावोगावी लघुउद्योग उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे, युवकांना व महिलांना स्वावलंबी बनविणे हा आमचा संकल्प आहे. गोवंश उत्पादने ही पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि बाजारात मोठ्या मागणीची असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी क्रांतिकारी ठरेल.”
या उपक्रमाला शासकीय योजना, CSR फंड व स्थानिक सहकारातून चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, गोसंवर्धन व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात "शेण-गोमुत्र आधारित उद्योग" हा नवा आर्थिक विकासाचा आणि स्वावलंबनाचा मार्ग ठरणार आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी , ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी संपर्क
गोकुळ लगड उपाध्यक्ष आणि कृषी समिती प्रमुख 7096572126


0 टिप्पण्या