Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाना पाटेकर यांचा अभिनय क्षेत्राला निरोप ?

"

नाना पाटेकर यांचा अभिनय क्षेत्राला निरोप ?

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह- संजय डुबल
अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतोय! आजवर खूप काम केलं, आता मनासारखं जगावंस वाटतंय. एक जानेवारीला मी वयाची ७५री पूर्ण करेन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घेता याव्या यासाठी काही करावं असं वाटतंय... ज्यातून खूप काही सांगता येईल अशी जर एखादी कलाकृती आलीच तर ती करेन...पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या!.... 
'नाम फाउंडेशन'ची धुराही आता मकरंदनेच ( मकरंद अनासपुरे) पुढे न्यावी. नाम’ची पुढची पिढी उत्तम पद्धतीने आमचे काम पुढे नेत आहे. या कामाची व्याप्ती खूप वाढली आहे. आता त्यांनी हे काम पुढे न्यावं. ‘नाम'चं पुढील काम मकरंद ठरवेल... 'मी असेन तरच काम करीन' ही त्याची भूमिका चुकीची आहे. ‘नाम’सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या तरी समस्या सुटणार नाहित...'पण कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी नक्की असेन!"....ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची अभिनय क्षेत्रातील निवृत्ती जाहीर केली आहे. काल रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे 'नाम' फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पार पडला त्यावेळी नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले..
                        साभार - गणेश तळेकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement