Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुलुंड च्या महाराष्ट्र संघा चा प्रेरणा पुरस्कार निवृत्त लेप्टनंट जनरल खंदारे, कमांडो राहिलेले निवृत्त कर्नल अमिताभ वालावलकर यांना प्रदान...








मुलुंड च्या महाराष्ट्र संघा चा प्रेरणा पुरस्कार निवृत्त लेप्टनंट जनरल खंदारे, कमांडो राहिलेले निवृत्त कर्नल अमिताभ वालावलकर यांना प्रदान...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डुबल) - मुलुंडच्या महाराष्ट्र संघाकडून सन २०२५-२६ चा प्रेरणा पुरस्कार यंदा शनिवार, दिनांक २७ सप्टेबर रोजी निवृत्त लेफ्टनंट जनरल खंडारे व कमांडो राहिलेले निवृत्त कर्नल अमिताभ वालावलकर यांना ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी पुरस्कारमूर्तीची मुलाखत घेतली.
'जगभरात युद्धाचे प्रकार बदलत आहेत. हे युद्ध आता लष्करापुरते मयांर्यादित नसून अनेक प्रकारचे झाले आहे. यामुळेच केवळ लष्करी जवानच नाही तर प्रत्येक नागरिक हा योद्धा आहे. त्यासाठी नागरिकांनी सजग असावे', असे कळकळीचे आवाहन निवृत्त लेफ्टनंट जनरल व संरक्षणमंत्र्यांचे माजी सल्लागार विनोद खंडारे यांनी व्यक्त केले.
निवृत्त कर्नल वालावलकर यांनी यावेळी कमांडो कारवाया कशा होतात यासंबंधी थरारक अनुभवांची माहिती दिली. 'काही मोहिमांसाठी
सहा-सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची गरज असते. काही वेळा एखाद्या मोहिमेवर असताना अचानक दहशतवाद्यांशी सामना होतो व त्यावेळी कुठल्पाही नियोजनाशिवाय काही सेकंदातच प्रत्यक्ष गोळीबाराची स्थिती निर्माण होते. ते काही सेकंद हा जीवन-मरणाचा प्रश्न असतो, असे निवृत्त कर्नल वालावलकर यांनी सांगितले.

"जेथे शौर्य ही झुकवते माथा" हे प्रदर्शन  राहुल येलापूरकर सादर केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, निवृत्त कमोडोर श्रीकांत केसनूर, स्वातंत्र्यवीर अभ्यास मंडळाचे विनायक काळे, कार्यक्रमस्थळी  महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, उपाध्यक्ष सतीश पाटणकर, अरुण भंडारे,  यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटरतर्फे लष्करी मानवंदना देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement