संगीतकार व गीतकार अतुल लोहार यांना राज्यस्तरीय पुरस्कार..
शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड
यांचे वतीने दिला जाणारा प्रतागडचा रणसंग्राम शूरवीर जिवाजी महाले राज्यस्तरी आदर्श सांस्कृतिक पुरस्कार संगीतकार अतुल लोहार यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
समाजभूषण शंकररावजी गायकवाड यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष अधिकराव चव्हाण शूरवीर शिवाजी माले उत्सव समिती किल्ले प्रतापगड, सचिव मंगेशराव काशीद तसेच इतर मान्यवर यांचे उपस्थितीत हा पुरस्कार अतुल लोहार यांना प्रदान करण्यात आला.
अतुल लोहार यांना संगीत क्षेत्रातील कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. अतुल यांनी आजपर्यंत मराठी अल्बम्स,व चित्रपट गीतांना लिहिले व गायले व संगीतबद्ध केले आहे. पिकुली चित्रपटातील एका गीतासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोत्तम संगीतकार म्हणून अतुल ला गौरवले आहे.
अतुल यांचं लोकप्रिय ठरलं ते तुझा झगा ग वाऱ्यावर उडतो हे गीत, या गाण्याची लोकप्रियता एवढी झाली की खयातनाम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांचे चित्रपटातील एका दृष्यात या गीताचा काही भाग वापरला आहे. या गाण्याचे गीतकार स्वतः असून, स्वतः गाऊन सांगितबद्ध ही केलं आहे..
म्हावशी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे ग्रामीण भागात राहून ही गीतकार व संगीतकार म्हणून आपला वेगळा ठसा मनोरंजन क्षेत्रात उमटवला आहे.
गीतकार व संगीतकार अतुल लोहार यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.


0 टिप्पण्या