Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ रंगकर्मी अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे आज सकाळी पहाटे हद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरीच निधन.

मुंबई - संजय डूबल जेष्ठ रंगकर्मी अभिनेते दिग्दर्शक अजित भगत यांचे आज सकाळी पहाटे हद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरीच निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. 
        बी एस एन एल मध्ये नोकरी करत नाटकातुन कामे करत. अविष्कार मध्ये सत्यदेव दुबे यांचे सोबत अनेक नाटके केली. जांभुळ आख्यान, आय एन टी चे नाटक, लगीन माझ्या खंडोबाच, त्यांनी प्रायोगिक रंगभुमी वर अनेक सादर नाटके केली. 
झी साठी प्रायोगिक रंगभुमी चे परिक्षक होते. 
       मागील काही दिवसापुर्वी हद्यविकाराचा झटका आल्याने ते केइएम हाॕस्पीटल ला अॕडमिट होते. 
   त्यांना डिस्चार्ज ही देण्यात आला होता मात्र आज पहाटे 3 वा ह्दयविकाराचा पुन्हा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राण ज्योत मावळली. 
       त्यांचे निधनाने रंगभुमी वर शोककळा पसरली आहे. 
       अंत्ययात्रा कांदिवली पश्चिम येथुन सकाळी 10 वा निघेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement