Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाद प्रतिष्ठान' मुंबई. संस्थेचे वतीने 'नाट्य अभिनय' व 'नृत्य प्रशिक्षण'शिबिराचा शुभारंभ संपन्न.

मुंबई - संजय डुबल - 'नाद प्रतिष्ठान' मुंबई या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिना निमित्ताने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा तसेच कामगार नाट्य स्पर्धा याकरीता कलाकारांची निवड करण्याच्या उद्देशाने दिनांक 4 ते 6 एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत बेसिक नाट्य अभिनय व नृत्य प्रशिक्षण शिबिराचे  आयोजन केले आहे.          या शिबीराचे उद्घाटन लेखक दिग्दर्शक व अभिनेता शेषकुमार सावंत यांचे हस्ते पार पडले. 'नाद प्रतिष्ठान' मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अशोक सवणे, व अनिल सुतार यांनी या शिबीराचे आयोजन केले.

       यावेळी उपस्थित  चित्रपट अभिनेता संजय डुबल यांचा 'नाद प्रतिष्ठान' चे अध्यक्ष चित्रपट निर्माते व अभिनेते अशोक सवने यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच अन्य प्रमुख मान्यवरांचेही स्वागत केले.
     अभिनेते विजय झिमुर, दिग्दर्शक प्रकाश पवार, कलावंत प्रकाश दरवेशी, जीवाजी पांढरे, पी जी चाळके, अविनाश गायकवाड, महादेव मोरे, पत्रकार महेश तेटांबे, पत्रकार आवाज माझा चे गणेश तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    या शिबीरात सहभागी प्रशिक्षणार्थीं कडुन सादरीकरण केले जाणार असुन, त्यांना सहभाग प्रमाणपञ देऊनही गौरवण्यात येणार आहे.
        सदर शिबिरात नाट्य क्षेत्रातील लेखन आणि दिग्दर्शन  प्राचार्य अवधूत भिसे , दत्तात्रय पेडणेकर आबा,
रंगमंचीय नृत्य मार्गदर्शक
अनिल नरहरी सुतार
*प्रकाश योजना*
संजय कोळी.
आदी  दिग्गजांनी मार्गदर्शन केले.

     आज  शिबीराचा शेवटचा दिवस असुन या
प्रशिक्षणाचा लाभ नृत्य व अभिनयाची आवड जोपासणा-या नवोदित कलाकारांनी घ्यावा असे आवाहन नाद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष चित्रपट निर्माते व अभिनेते अशोक सवने यांनी केले.
प्रवेश सर्वांसाठी खुला असुन शिबीरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात  येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*शिबिराचा पत्ता*
पी.ई.एस.महाराष्ट्र हायस्कुल. गोखले रोड दादर.
आगर बाजार जवळ, दत्ता राऊळ मैदाना समोर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement