Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी सापडले मृतावस्थेत... 'मुंबईचा फौजदार' काळाच्या पडद्याआड...

मुंबई - संजय डुबल - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. पुणे येथील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहत असत. मात्र दोन - तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू  झाल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली. 

       उपलब्ध माहिती नुसार, गेल्या काही दिवसां पासून ते तेथे भाडेतत्वावर राहत होते. त्याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत असल्या  बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेत सदनिकेचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. ते 74 वर्षांचे होते.

    शुक्रवारी रवींद्र महाजनी यांचा मुंबईत राहत असलेला मुलगा अभिनेता गश्मिर तिथे आला होता. यानंतर त्यांचं निधन झालं असल्याची घटना उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे.

     आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रविंद्र महाजनी यांनी टॅक्सी चालवली आणि चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. 1987-1988 पर्यंत त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. 

    रविंद्र महाजनी यांनी "हा सागर किनारा", "सुंबर गाव देवा" आणि "फिटे अंधाराचे जाळे" यासह अनेक रोमँटिक गाण्यांमध्ये अभिनय केला. त्यांचा देवता हा चित्रपट ग्रामीण रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. तो दुनिया करी सलाम (1979), मुंबई चा फौजदार (1984), झुंज (1989), कळत  नकळत (1990) आणि आराम हराम अहे मधील भूमिकांसाठी ओळखला जातो . नंतरचा चित्रपट मोठा हिट ठरला तर लक्ष्मी ची पावले ब्लॉकबस्टर ठरला. त्याने 2015 मध्ये 'काय राव तुम्ही या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धा पासून ते ऐंशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत, महाजनी यांनीअनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मराठीतील देखना नटाच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.       

          रविंद्र महाजनी यांचे काही चित्रपट 

वर्ष चित्रपट
1969   सात हिंदुस्थानी 
1976आराम हराम आहे
१९७९दुनिया करी सलाम
१९७९हळदी कुंकू
१९७९किशोर चेहरे
1982गोंधळात गोंधळ
1983देवता
1984मुंबईचा फौजदार
1987सर्जा
1988उनाड मैना
1989झुंज
1989बोलो हे चक्रधारी
1990कळत नकळत
1992जगावेगळी पैज
आशा पुरामणी नी छिंदरी
2015काय राव तुमही
२०१५  कॅरी ऑन मराठा

2019 पाणीपत - मल्हारराव होळकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement