Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


लोकांचा अधिकार’ या विषयावर मुंबईत ग्लोबल कॉन्फरन्सचं आयोजन- जयहिंद लोकचळवळ या संस्थेतर्फे होणार जागतिक परिषद- विविध देशांतील मान्यवरांचा सहभाग- शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी आदी क्षेत्रांतील अधिकारांवर चर्चा


लोकांचा अधिकार’ या विषयावर मुंबईत ग्लोबल कॉन्फरन्सचं आयोजन
- जयहिंद लोकचळवळ या संस्थेतर्फे होणार जागतिक परिषद
- विविध देशांतील मान्यवरांचा सहभाग
- शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी आदी क्षेत्रांतील अधिकारांवर चर्चा

                  आ. सत्यजीत तांबे
मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेनंतर आता मुंबईत एक महत्त्वाची परिषद होणार आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण संवर्धन, आर्थिक सक्षमता या क्षेत्रांतील लोकांच्या अधिकारांबाबत चर्चा करण्यासाठी जयहिंद लोकचळवळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्लोबल कॉन्फरन्स २०२३ चं आयोजन करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हे तीन दिवस मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या जागतिक परिषदेसाठी देशोदेशीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या परिषदेची धुरा आ. सत्यजीत तांबे पार पाडत आहेत. 

भारतातील विविधता टिकवून लोकशाहीला मजबूत करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करण्याच्या हेतून डॉ. सुधीर तांबे यांनी जयहिंद लोकचळवळ या संस्थेची स्थापना केली. गेले तीन वर्षं ही संस्था जागतिक परिषदेचं आयोजन करत असून यंदाची चौथी कॉन्फरन्स मुंबईत होणार आहे. कोरोना महामारीमुळे ही परिषद ऑनलाईन पद्धतीने होत होती. आतापर्यंत या परिषदेत ४० पेक्षा जास्त देशांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे.
सुदृढ समाजनिर्मिती केल्याशिवाय सशक्त जागतिक महासत्ता होता येणार नाही, या पायावर कामाची उभारणी करणाऱ्या जयहिंद लोकचळवळ या संस्थेने जागतिक परिषदेचं आयोजन केलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने होणारी ही परिषद यंदा पहिल्यांदाच ऑफलाईन होत आहे. या परिषदेसाठी दहा पेक्षा जास्त देशांतील प्रतिनिधी उपस्थित असतील. ‘लोकांचा अधिकार’ या विषयी परिषद होणार आहे. ते शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी निर्मूलन, कृषी, पर्यावरण संवर्धन, आर्थिक सक्षमता आदी विषयांसह सशक्त व निकोप लोकशाही या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच युवा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून संघटना बांधणी उपक्रम देखील राबविला जाणार आहे.

मागील परिषदेत ‘या’ दिग्गजांची लावली हजेरी
सिध्दार्थ मुखणे (Associate Director, UK-India Business Council UK), सचिन इटकर (Researcher), श्री ठाणेदार (Michigan House Representative USA), अरुण गांधी, सॅम पित्रोदा, प्रो. उगुर एरुलीकर (तुर्कीए आणि इंडोनेशिया), डॉ. रवींद्र गोडसे, विशाल चोरडिया, सनम अरोरा (इंटरनॅशनल स्टुडंट असोसिएशन), इझुमी किताझवा (जपानच्या होक्काईडो विद्यापीठातील शास्त्रज्ञ), फ्रँक इस्लाम (उद्योजक) आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement