Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


४० व्या मजल्यावरुन लिप्ट अंगावर कोसळल्याने ६ कामगारांचा दुर्देवी मृत्यु तर एक गंभीर जखमी. ठाणे बाळकुम येथील घटना...

मुंबई -  ठाणे - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह.- बाळकुम परिसरातील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीच्या  ४० मजली छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून सात कामगार लिप्टने खाली येत असताना लिप्ट चा रोप तुटल्याने ५ कामगारांचा जागेवरच दुर्देवी मृत्यु झाला. दोघा जखमींना हाॕस्पीटल मध्ये दाखल केले मात्र  एकाचा हाॕस्पीटल मध्ये मृत्यु झाला. 
    सदर अपघात सायंकाळी पाच चे दरम्यान घडली असुन खबर मिळताच कापुरबावडी चे पोलीस दल व अग्नीशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी टीमसह तातडीने पोहोचले.

   

बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन गंभीर जखमी  कामगारांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या दरम्यान आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. 

या दुर्मघटनेत मृत्यू पावलेले कामगारांची नावे महेंद्र चौपाल (३२), रुपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७ ) , मिथलेश (३५) , कारिदास    ( ३८) अशी मृत कामगारांची नावे असून, सहाव्या मृत कामगारां नाव समजू शकलं नाही. तसेच सुनिल कुमार दास (२१) हे जखमी कामगाराचे नाव आहे, सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement