Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला (बिरबल खोसला) यांचे निधन.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - बाॕलीवुड चृ प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते सतींदर कुमार खोसला (बिरबल खोसला) यांचे मंगळवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. चित्रपटांत कॉमिक भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 
     बिरबल यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1938 रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला होता. अमीर गरीब', 'रास्ते का पत्थर', 'सुन मेरी लैला', 'अनिता', 'इंसान', 'एक महल का सपना हो', 'मोहब्बत की आरजू' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू दाखवली.
  आज १३ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 अंधेरीतील सात बंगला येथे त्यांचे घर आहे.
     १९६७ मध्ये 'उपकार' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी पंजाबी, भोजपुरी आणि मराठी भाषेतील चित्रपटांसह सुमारे ५०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिरबल यांनी 'मेरा गांव मेरा देश', 'शोले', 'तपस्या', 'सदमा', 'दिल' आणि 'फिर कभी' यांसारख्या चित्रपटां बरोबर जवळपास ५०० चित्रपटांमध्ये त्यांनी भुमिका  केल्या. यामध्ये मराठी, हिंदी, पंजाबी आणि भोजपूरी चित्रपटांचा समावेश आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement