Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


शिवस्वामिनी, एक अनोखी स्पर्धा! 'दिवाळी फराळ बुकिंग' स्पर्धक भगिनींसाठी....

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल)
✨ शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना ✨
रोजगार व स्वयंरोजगार अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत
महाराष्ट्रातील भगिनींसाठी घेऊन आलो आहोत
🌸 शिवस्वामिनी 🌸
ही एक अनोखी स्पर्धा!
विषय : दिवाळी फराळ बुकिंग
स्पर्धक भगिनींनी या विषयावर आपला एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे.
जास्तीत जास्त भगिनींनी भाग घेऊन महिला सक्षमीकरण उपक्रमात खारीचा वाटा उचलावा. 
📌 स्पर्धेचे नियम
१) विषय – दिवाळी फराळ बुकिंग
२) प्रवेश शुल्क – शून्य (फ्री)
३) व्हिडिओ – कमाल ३ मिनिटांचा (त्यापेक्षा मोठा व्हिडिओ अपात्र).
४) कोणत्याही वयोगटातील भगिनी सहभागी होऊ शकतात.
५) मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना मोबाईल आडवा धरावा.
६) व्हिडिओ प्रकाशित –
YouTube: @ShivUdyogSanghtana
Instagram: @shiv_udyog
७) प्रकाशन कालावधी – २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५
८) व्हिडिओ पाठवताना आपले नाव व संपर्क क्रमांक लिहावा.
९) आपले व्हिडिओ पाठवण्याचा क्रमांक : 9833542585
🖥️ यूट्यूबवरील प्रतिक्रिया मोजणी
१) व्हिडिओ प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या प्रतिक्रिया मोजल्या जातील.
२) रात्री १२ वाजेपर्यंतच्या प्रतिक्रिया ग्राह्य धरल्या जातील.
३) फक्त इमोजी असलेल्या प्रतिक्रिया ग्राह्य नाहीत.
४) एकाच व्यक्तीच्या अनेक प्रतिक्रियांपैकी फक्त एकच मोजली जाईल.
५) स्पर्धकाने स्वतः दिलेली प्रतिक्रिया ग्राह्य धरली जाणार नाही.
६) प्रत्येक ३ पात्र प्रतिक्रियांना २ गुण दिले जातील.
७) फक्त ३ च्या पटीतील प्रतिक्रिया मोजल्या जातील.
🏆 विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
🥇 प्रथम पुरस्कार – ₹ २०००/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥈 द्वितीय पुरस्कार – ₹ १०००/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🥉 तृतीय पुरस्कार – ₹ ५००/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
🎖️ सर्व स्पर्धकांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र
📅 पारितोषिक वितरणाची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल
📞 संपर्क
वैशाली नाईक
महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख
📱 9833542585

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement