जातीधर्माच्या पलीकडे माणूस मोठा आहे ः सुशिल मोझर
सर्वांना सोबत घेऊन केलेले काम उल्लेखनीय ठरते, चिश्ती च काम कौतुकास्पद...
हिंदू मुस्लिम, जातपात, धर्म याच्या पलिकडे जाऊन विचार केला तर माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या सर्वांचे रक्त लाल आहे म्हणजे आपण एक आहे फक्त जातीपातीच्या कवचकुंडलांमध्ये अडकून न राहता माणूस म्हणून एकत्रित आले पाहिजे. पाटणचा हा उरुस माणूसकीचे उत्तम उदाहरण आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित घेऊन एका छताखाली गुण्यागोविंदाने सामाजिक काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे. माणूसकीचे उत्तम उदाहरण मला इथे पाहायला मिळाले अस मत रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी व्यक्त केले.
रामापूर, पाटण येथे पुणेवाले यांचा उरुस सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या भेटी, शुभेच्छा दिल्या. एमके ३१ सोशल फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास श्रीनाथ भिमाले सभागृह नेता भाजपा महानगरपालिका पुणे, गफूर पठ्ठाण नगरसेवक राष्ट्रवादी कोंढवा, पुणे, रविराज देसाई मोरणा शिक्षण संस्था अध्यक्ष, याज्ञसेन पाटणकर कोयना एज्युकेशन सोसायटी संचालक, संजीव चव्हाण कोयना एज्युकेशन सो संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोझर यांनी, हिंदू मुस्लिम ऐक्य आपण बोलत असतो परंतु प्रत्यक्ष आज इथे पाहायला मिळाले. आपल्या धार्मिक कार्यक्रमात सामाजिक भान ठेऊन सामाजिक उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद आहे. मी स्वतः कधी धर्म जातपात मानत नाही. आपल्या कडे आला तो आपला आणि एकदा आपला झाला की आपण आहे तोपर्यंत तो आपल्याला सोडून जाता कामा नये अस काम आपण केले पाहिजे. जगात जन्माला येताना एक व्यक्ती म्हणून येतो इथे आल्या नंतर आपल्या धर्म, जात, नाव वैगरे मिळते. जन्म आईवडिल देतात परंतु कर्म हे ज्याचे त्याने करायचे असते. ज्याचे कर्म चांगले त्याला फळ ही चांगले भेटते. आपल्या हातून करता येईल इतके चांगले आपण करायचे. या जगात माणूसकीचे नाते मोठे आहे. जगात ज्याने माणसे जोडली तो माणूस सर्वांत श्रीमंत. त्यामुळे काय मोठे तर माणूस मोठा आहे.
फौंडेशनचे काम चांगले आहे. करत असलेल्या कामाची दखल कोण ना कोण घेत असते. माणसं जोडण्याचे काम तुमच्या मार्फत केले जात आहे हे सर्वांत मोठे काम आहे.
श्रीनाथ भिमाले, जगात अनेक लोक आहे परंतु काही मोजकेच लोक या मातीशी बांधिल आहेत. पुण्यात स्थाईक असुनही चिश्तींची नाळ आपल्या मातीशी जोडलेली आहे. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी ते करत असलेले काम गौरवास्पद आहे. ते लोकांची दुवा घेत आहे. त्यांच्या परिस्थिती वरती दवा देऊन, दुवा मिळवण्याचे त्यांचे काम अतिशय चांगले आहे. हल्ली लोकांनाकडे पैसा आहे परंतु स्वास्थ्य नाही इथे मनशांती आहे यामुळे मन प्रसन्न होते.
या कार्यक्रमास सोपान टोंपे प्रांताधिकारी, अनंत गुरव तहसीलदार, सदगर सर एपीआय पाटण, मुत्तवल्ली सर दु निबंधक, विजय पवार पं.स सदस्य, संतोष गिरी मा. पं स, अँड सी जे गायकवाड, यांनी भेटी दिल्या.
सूत्रसंचालन विद्या म्हासुर्णेकर यांनी तर आभार गोरख नारकर यांनी मानले.


0 टिप्पण्या