Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


राज्यातील कला व संगीत महाविद्यालयांसाठी येणार 'महाराष्ट्र बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन' – सत्यजीत तांबे. कला महाविद्यालयांच्या विविध समस्यांविषयी कला संचालकांची भेट घेऊन आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा.

राज्यातील कला व संगीत महाविद्यालयांसाठी येणार 'महाराष्ट्र बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन' – सत्यजीत तांबे.

कला महाविद्यालयांच्या विविध समस्यांविषयी कला संचालकांची भेट घेऊन आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा.
 
कला क्षेत्राच्या प्रवेश प्रक्रियेतील जाचक अटी रद्द कराव्यात यासह विविध मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा.

मुंबई - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह.. राज्यातील कला व संगीत महाविद्यालयांसाठी महाराष्ट्र बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन तयार करण्यात येणार आहे. तंत्रशिक्षणाच्या धर्तीवर हे बोर्ड काम करेल. कला, सांस्कृतिक, संगीत, फायनाडस् इत्यादी कलांचे प्रकार आहेत. त्यांच्यावर आता हे बोर्ड तयार केले जाणार आहे. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात यावर कायदा केला जाईल, त्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. 

राज्यातील कला महाविद्यालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविषयी आ. तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांची भेट घेतली व कला महाविद्यालयांच्या समस्यांबाबत व्यापक चर्चा केली.
 
आ. तांबे यांच्यासह कला महाविद्यालय संघाचे अध्यक्ष भरत बोराटे, सचिव संजय सोनवणे व संघाचे पदाधिकारी यांच्यासह कला संचालक मिश्रा, कला उप-संचालक (प्रशा) विनोद दांडगे यांची भेट घेतली व समस्यांचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील विनाअनुदानित कला महाविद्यालयाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
जोपर्यंत महाराष्ट्र बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन अॅक्ट २०२३ लागू होत नाही. तोपर्यंत अंतरिम शिक्षण शुल्क २०२३-२४ करता कलासंचालकांनी त्वरित ते लागू होणेबाबत कार्यवाही करावी, असा निर्णय शुल्काबाबत घेण्यात आला. कला संस्थांना अनुदानाबाबत ही धोरणात्मक बाब असल्याने शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा कला संचालनालयाने संघटनेच्या बरेच वर्षांच्या मागणीनुसार त्वरीत करावा असे सांगण्यात आले. ऑनलाइन प्रवेश झाल्यानंतर ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर करण्याबाबत चर्चा झाली व त्यास काही हरकत नसावी, असे ठरवण्यात आले.

कलाक्षेत्रात येणारे विद्यार्थी फार तुरळक असतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत फार जाचक अटी असू नयेत व ज्या जाचक अटी असतील. त्या त्वरित रद्द करुन योग्य ते सहकार्य सर्व सलग्न विभागांनी प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांना करावे, असा निर्णय घेण्यात आला. सन २०२३-२४ मधील प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थांना ४५ टक्के व खुला संवर्ग विद्यार्थाना ५० टक्केची अट शिथिल करण्यात यावी, असे यावेळी ठरवण्यात आले. या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांवर सर्वानमुते निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement