नितीन पिसाळ आदर्श समाज भुषण पुरस्काराने सन्मानित....
पाटण.- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(चंद्रकांत सुतार) नितीन पिसाळ यांच्या फ्लाॅवर नही फायर है सामाजिक कामांना योग्य न्याय मिळवून देत. खुद गब्बर अशी स्वभावोक्ती असलेले.पाटण नगरीचे समाज सेवक मा. नितीन पिसाळ समाज सेवेतून नावा रूपाला आलेले सर्वसामान्यांतील असामान्य करारी व्यक्तीमत्व होय.

यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत.2025 सलातील द युवा ग्रामीण पत्रकार संघटना महारष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श समाज भुषण पुरस्कार सातारा या ठिकाणी सुरभी मंगल कार्यालयात सातारा प्रमुख मान्य वरांच्या शुभ हस्ते देण्यात आला द ग्रामीण पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुख बाळा साहेब कोठूळे यांच्या हस्ते, संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा नितीन तारळकर साहेब, अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील, राज्य उपl.जीवन मोहिते सर सातारा पोलिस निरीक्षक तांबे साहेब,सॉ.राजश्री मोहीते मॅडम जिल्हा सचिव चेतन भोसले, कराड अध्यक्ष प्रमोद दिवांण सर श्री डी. एम.सुतार चाफळकर प्रशासकीय अधिकारी अध्यक्ष सातारा एअर फोर्स असोसीएशन अनेक मान्यवर उपस्थित होते.नितीन पिसाळ यांच्या सामजिक कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नितीन पिसाळ यांनी महापूर,भूस्खकलन आणि महामारी कोराना यासारख्या जागतिक आपत्ती काळात अनेक मार्गाने आपल्या असिम समय सूचक व्यवस्थापन बुध्दीने सरकारी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य जनतेसाठी आपला जीव धोक्यात घालून तसेच प्रसंगी नापरतावा पैशाची मदत केली.तालुक्यातील पिडीत समाज घटकाला सर्व परीने मदतीचा हात दिला. पाटण शहरातील नागरी सुविधां बाबत सतत प्रयत्नशिल असणारे, समाजाबद्दल सेवाभावाची कृतज्ञता वाहणारे समाजवेडे अनभिषिक्त सेवाभावी दलपती.
ज्यांनी महामारी आणी-बानीत माणुस्की जपली. याची दखल घेऊन सातारा राजधानी येथील 'द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा यांनी सामाजिक सेवेबद्दल पुरस्काराने सन्मानित केले. ही बाब पाटण शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने पाटण शहर व पाटण तालुक्यातील त्यांचे हितचिंतक आनंदोत्सव साजरा करत आहेत.त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अश्या या कृतीशिल व्यक्तीमत्वास त्रिवार मुजरा.
0 टिप्पण्या