Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


​पिंपळोशी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

​पिंपळोशी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

पाटण - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - ( प्रतिनिधी चंद्रकांत सुतार ) - पिंपळोशी ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने, पिंपळोशी तालुका पाटण जिल्हा सातारा  येथे पिंपळोबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावातील व परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
       ​या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी ११:०० वाजता गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​शिबिरातील ठळक वैशिष्ट्ये:
​तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी: नामांकित रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी हृदयविकार, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्रतपासणी आणि जनरल चेकअप यांवर मार्गदर्शन व उपचार केले.
​मोफत औषध वाटप: तपासणीनंतर गरजू रुग्णांना संस्थेच्या वतीने मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
       ​रक्तदाब व शुगर तपासणी: वाढत्या जीवनशैली आजारांच्या पार्श्वभूमीवर अनेकांची मोफत रक्तदाब आणि साखर तपासणी करण्यात आली.
        ​पिंपळोबा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष  श्री कृष्ण निकम यांनी सांगितले की, "ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि वेळेत उपचार मिळावेत, या सामाजिक बांधिलकीतून आम्ही या शिबिराचे आयोजन केले आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र केरळ पदाधिकारी मेघा पाटोळे सी.एच.ओ. अनिल खंडागळे एम.पी. डब्ल्यू.संगीता खुडे ए. एन. एम. प्रांजली पवार प्रयोगशाळा त तंत्रज्ञ.  आशा सेविका. पूजा पाटील. मनीषा थोरवडे. सुषमा सोनवले सुरेखा निकम.अध्यक्ष श्री कृष्ण निकम. उपाध्यक्ष प्रदीप निकम. सचिव अंकुश निकम. खजिनदार प्रकाश निकम.  सरपंच विशाल निकम.सदस्य सुनील पवार. तानाजी काळे. सीमा कदम. मारुती निकम. मान्यवर अरुण काळे. संपत निकम. शिवराज निकम. धनाजी निकम.
​           या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्याबाबतच्या या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement