दिवंगत नाना पाटेकर यांना दिग्गज कलाकारांची श्रद्धांजली; प्रार्थना सभेला मान्यवरांची उपस्थिती...बॉलीवूड कलाकारांची अनुपस्थिती....
मुंबई | आपला महाराष्ट्र न्यूज LIVE (संजय डुबल )
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रार्थना सभेला मी स्वतः उपस्थित होतो.
यावेळी चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती होती तर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाना पाटेकर यांना त्यांनी आपल्या आठवणी जागवत आदरांजली वाहिली. चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी ही आपले मनोगत वक्त करत आदरांजली वाहिली.
पुरुषोत्तम बेर्डे, वर्षां उसगांवकर आणि शिवाजी साटम यांनी केल्या आठवणींना उजाळा दिला, या प्रार्थना सभेला राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे,
तुकाराम मुंढे , चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, क्रांतिवीर चे निर्माते दिग्दर्शक मेहुल कुमार आदींनी यांनी आपले मनोगत व्यक्त करून नानांना आठवणीना उजाळा देत आदराजली वाहिली.
या प्रार्थना सभेला अभिनेत्री वर्षा उसगांवकर, ज्येष्ठ अभिनेते आणि ‘CID’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले शिवाजी साटम, सुशांत शेलार, पंढरीनाथ कांबळे, दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अली खान, सविता मालपेकर, जयवंत वाडकर, के. के गोस्वामी यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रार्थना सभेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संपादक संजय डुबल
9172830799
जगभरात 1 लाख वाचक असलेलं न्यूज portal


0 टिप्पण्या