Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


लढा पंचायतीचा चित्रपट प्रदर्शनास सज्ज..


      मुंबई - संजय डुबल - दुर्ग प्रेरणा फिल्म्स प्रोडक्शन निर्मित *लढा पंचायतीचा* या चित्रपटाचे पोस्टर लाँंचिंग व ट्रीझर राज्यभर  प्रदर्शित झाले. 
    सत्य घटनांशी जवळीक साधणारा, आगळी वेगळी कथा असलेला लढा पंचायतीचा हा चित्रपट 10 मार्च 2023 रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
    या चित्रपटाची निर्मिती पोपटराव खटावकर यांनी केली असुन दिग्दर्शन संदीप पाटील यांचे तर कथा पद्मजा खटावकर यांची असुन या चित्रपटास संगीत चंद्रकांत जगताप, संकलन अक्षय जगताप, छायांकन रोशन ऐडके,  पार्श्वसंगीत विवेक जगताप,  पोस्ट प्रोडक्शन ND9 स्टुडीओ, सोशल मिडीया दवंडी मिडीया,  कॕलिग्राफी व पोस्टर डिझाईन श्रेयश उज्जैनकर, तर वितरण क्रीस्टल फिल्म कंपनी करत आहे.
      लढा पंचायतीचा या चित्रपटात डाॕ. पद्मजा खटावकर, संजय खापरे यांच्या प्रमुख भुमिका असुन  भक्ती चव्हाण,संदीप पाटील , एन डी चौगुले, उमेश बोलके,  साक्षी नाईक, रामहरी मिसाळ, सचिन डोंबाळे, सचिन कांबळे,राहुल दशवंत, केतकी पाटील, सृष्टीराव, तुलसी देवकर,
सुरेंद्र बोंगाळेचे यांच्या ही भुमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement