अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या स्वीकृत संचालकपदी ॲड. नीलम शिर्के-सामंत व रत्नकांत जगताप यांची निवड....
मुंबई, - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल (अभिनेता): अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची बैठक आज मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत तसेच कार्यकारी निर्माते श्री. रत्नकांत जगताप यांची स्वीकृत संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली.
ॲड. नीलम शिर्के-सामंत आणि श्री. रत्नकांत जगताप यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कार्यातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, ज्ञानाचा आणि कार्याचा लाभ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुढील वाटचालीस निश्चितच होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
त्यांच्या अनुभवाचा उपयोग मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांच्या हितासाठी व्हावा, अशी अपेक्षाही महामंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल ॲड. नीलम शिर्के-सामंत आणि श्री. रत्नकांत जगताप यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पदाधिकारी, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग यांनी दोघांनाही मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत


0 टिप्पण्या