Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


“उंदीर मामाची गाडी निघाली” | गणेशोत्सवातील नवे मराठी गीत ..

गणेशोत्सवात भक्ती आणि आनंदाची नवी लहर!
“उंदीर मामाची गाडी निघाली…”.
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल :- गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणखी रंगत आणणारे एक नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. “भेटीला उंदीर मामाची गाडी निघाली…” या आकर्षक शीर्षकाच्या गाण्याने गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. याच उत्साहाला साजेसे हे गाणे असून, गणपती बाप्पांसोबत भक्तांच्या भेटीला निघालेल्या उंदीर मामाची कल्पना गाण्यातून सुंदर आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
पारंपरिक गणेशभक्तीचा बाज आणि आधुनिक संगीताची सांगड या गाण्यात पाहायला मिळते. गाण्याचे शब्द, संगीत, गायन आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह, भक्ती आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या गाण्याची निर्मिती जीवन गंगाराम वालीलकर (दहिसर मोरी) यांनी केली असून, दिग्दर्शन श्रीनाथ धुलाराम पाटील (उत्तरशीव) यांनी केले आहे. गीत-संगीत तीर्थनाथ मुंडे आणि प्रथमेश राणे यांचे असून, गायन तीर्थ मुंडे आणि अश्विनी जोशी यांनी केले आहे. कॅमेरा मॅन आशिष गुप्ता तर व्हिडिओ एडिटिंग तीर्थ मुंडे यांनी केले आहे.

या मध्ये श्याम दगडू पाटील, सविता (रोशनी) म्हात्रे, दिनेश, भागवत, दीपाली भागवत (स्टार प्रवाह कमली सिरियल), प्रियांका कोरी, श्रीनाथ पाटील आणि सूर्यकांत वाघमारे (बाजिगर) आदी कलाकारांचा सहभाग आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे गाणे रसिकांचे मनोरंजन करण्यासोबतच भक्ती आणि आनंदाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
गणेशभक्तांनी हे गाणे आवर्जून ऐकावे आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करावे, असे आवाहन निर्माता व दिग्दर्शक यांनी केले आहे.

 गीताची लिंक 👇

https://youtu.be/eS3OE2jmVWc?si=AEonkFxTuiMhyTGs

संपादक - संजय डुबल 
9172830799
9833829232

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement