Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'शिव सक्षम प्रतिष्ठान' संचलित 'निकम स्पोर्ट्स क्लब पाटण' 77 वा 'प्रजासत्ताक दिन' साजरा...

शिव सक्षम प्रतिष्ठान संचलित निकम स्पोर्ट्स क्लब पाटण प्रजासत्ताक दिन साजरा...

पाटण. - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (प्रतिनिधी चंद्रकांत सुतार) : देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसक्षम प्रतिष्ठान संचलित निकम स्पोर्ट्स क्लब पाटण ज्येष्ठ  नागरिक ज्ञानदेव पिलोबा साळुंखे उर्फ अण्णा वय 87 वर्ष यांच्या शुभहस्ते  सकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
      आदरणीय साळुंखे अण्णांना आम्ही लहानपणापासून सायकलवर जाताना येताना पाहिले रणजित टॉकीज सिनेमा पाटण पासून शेतीच्या मळ्यापर्यंत काबाडकष्ट करत मितभाषी राहून सतत हसतमुख तांडमंड उंच चपळ असणारे साळुंखे अण्णा हे वयाच्या 87 व्या वर्षी सुद्धा खूप फिट आहेत त्यांना पाहिले की इतिहासातल्या लढवय्या शेलार मामाची आठवण येते. 
  अशा आदरणीय साळुंखे अण्णा यांच्या हस्ते निकम स्पोर्ट क्लबचे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. 
     प्रजासत्ताक सोहळ्यास पाटण शहरातील विविध पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्वांचे आभार निकम स्पोर्ट क्लब पाटण संस्थापक चंद्रगुप्त निकम यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement