मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह-(संजय डुबल)
सा. आम्ही मुंबईकर वृत्तपत्र आयोजित पुरस्कार सोहळ्यास चित्रपट सृष्टीतील कार्यकारी निर्माते व कस्टिंग हेड सागर पतंगे यांची खास उपस्थिती असणार आहे.
समाजासाठी वेगेवगेळे उपक्रम राबवणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा, रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी जोगेश्वरी, मुंबई येथे सा.आम्ही मुंबईकर यांचे संपादक प्रमोदजी सूर्यवंशी व उप संपादीका सौ.वसुधा नाईक, योगेश हरणे, गौरव पुंडे, महेश सोनवणे, रेखा हरियाण, पल्लवी पवार व आम्ही मुंबईकर वृत्तपत्र परिवार यांच्या तर्फे आयोजीत करण्यात आला आहे.
सागर पतंगे
या सोहळ्यात महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गुण गौरव म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक अजय बिरारी नाशिक, प्रमुख पाहुणे कवी श्रीराम घडे, कार्यकारी निर्माता व कास्टिंग हेड मराठी चित्रपट सृष्टी सागर पतंगे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सागर पतंगे
प्रमुख पाहुण्यापैकी सागर पतंगे यांनी कला व चित्रपट क्षेत्रात कार्यकारी निर्माता म्हणून द थर्ड आय हा चित्रपट केलेला असून इतर बरेच चित्रपट केलेले आहेत. त्यांच्या ग्लोबल आडगाव, या चित्रपटास महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग , कलकत्ता इंटरनेशनल फिल्म फेस्टीवल, बर्लिन फिल्म फेस्टीव्हल, अजंठा फिल्म फेस्टीव्हल तसेच अनेक देशातील महोत्सवाचे ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.
सागर पतंगे यांनी गेम चेंजर, पन्हाळा १७०१, राडा, गैरी, ढीशक्याव, कल्टीमार, परसूअक्का, सोलमेट, लाहोर १९४७, मेनका, सितारे जमीन पर असे अनेक हिंदी, मराठी व तेलगू चित्रपट ला प्रोडक्शन वर्क केलेले आहे यातील काही चित्रपट प्रदर्शित झाले असून काही लवकरच प्रदर्शित होतील.
तसेच अनु फिल्म्स द्वारे सुरू होणाऱ्या आगामी नवीन प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्रातील कलावंत वर्गास नक्की संधी देण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या