Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'रंग बरसे 'सारखे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे विविध रंगांनी बहरू दे- नगरसेविका हर्षिता नार्वेकर.

स्टार इव्हेंट प्रस्तुत 'रंग बरसे' vol 2. 2023 प्रसंगी प्रमुख अतिथी नगरसेविका हर्षिता नार्वेकर.व आयोजक ट्विंकल भोसले. 
      मुंबई- संजय डुबल - 'रंग बरसे' सारखे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य ही विविध रंगांनी बहरू दे, आनंदाच्या या रंगोत्सवाने एकमेकां बद्दलचा बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होत आहे, या रंगोत्सवा निमित्त महीलां मधील सुप्त कलागुनांस वाव मिळाल्याने, महिलांमध्ये व्यक्तीमत्वाची जडन घडन होण्यास मदत होत असल्याचे मनोगत वाॕर्ड नं 226 च्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी केले, त्या स्टार इव्हेंट प्रस्तुत 'रंग बरसे' vol. 2 या महिलां साठीचा रंग बरसे Vol 2 -2023 सोहळ्यात 'प्रमुख अतिथी' म्हणुन उपस्थित होत्या. 
       सरस्वती मंदिर हाॕल माहीम येथे रंगोत्सव vol. 2 नुकताच संपन्न झाला. 
या मध्ये महिलां माधील सुप्त कला गुनांना वाव मिळाला. तसेच विविध खेळां सोबत नृत्य व रँम्पवाॕक स्पर्धाही पार पडली. 
     या वेळी पार पडालेल्या सोहळ्यात 'रंगबरसे 2023' चे प्रथम विजेत्याचा मान किरण गौर ठरल्या, प्रथम उपविजेत्या ठरल्या भक्ती जोन्स तर दुसरी उपविजेती सॅन्ड्रा डिसिल्वा ठरल्या. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.     
      'स्टार इव्हेंट'च्या आयोजित ट्विंकल भोसले यांनी या 'रंगोत्सव vol 2'
 चे आयोजन केले होते. यावेळी ट्विंकल भोसले, सुचित्रा लोंढे, विशाखा पाटील, किरण गौर, वीणा प्रभु, वैशाली वर्तक, सरीता परब,माया म्हात्रे, सँन्ड्रा डिसिल्वा, सब्रीना डिसिल्वा, शानिया भोसले,भक्ती जाॕनेस, प्रज्ञा भोसले, विभा जाधव, निकिता गायकवाड, स्वरदा पोतणीस, वर्षा कांबळे, ज्युलीएट बरकर, किरण पोतणीस, नयन पोतणीस, शामली दातार, पद्मीणी सावर्डेकर, डाॕ. अंजली, रूपा अंब्रुळे, दिप्ती वगळ.निकिता गायकवाड, किरण आदींनी सहभागी होत रंगोत्सव vol 2  मध्ये रंग भरला. 
    चित्रपट अभिनेता संजय डुबल सह गायकवाड काका यांचीही उपस्थीती होती.
       यावेळी महिलां सेल्फ हेल्प ग्रूपचे वतीने स्टाॕल्स लावण्यात आले होते. 
            सामुहीक नृत्याचे सादरीकरण करत तसेच रंगांची उधळन करत कार्यक्रमाची सांगता झाली.           बाल नृत्यांगना आरूषी कांबळे 
   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंटी यांनी केले, तर व्यवस्थापन संदिप वगळ, विजय कांबळे, रूपेश खरात, शाम मोहिते यांनी केले, संगीत संयोजन डिजे शैलेश यांनी केले तर छायाचित्रण ड्यारी परेरा यांनी केले. 

 कार्यक्रमाच्या संयोजिका ट्विंकल भोसले यांनी रंग बरसे vol 2 सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे भेटवस्तु देऊन मैत्रीपुर्ण आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement