Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पुणे - ओम तेजा प्रोडक्शन व बटरफ्लाय मुव्हीज यांच्या संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन पुणे येथे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर संपन्न.

पुणे - संजय डुबल - गुढी पाडव्याच्या औचित्य साधत, कँप पुणे येथे निर्माते वजीर शेख सर यांचे बटरफ्लाय मुव्हीज व अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टर महादेव शिरोळकर सर यांचे ओम तेजा प्रोडक्शन त्यांच्या संयुक्तिक कार्यालयाचा शुभारंभ पुणे येथील ज्येष्ठ कलावंत व नाट्य सीने अभिनेते श्री प्रदीप देवकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले.         सदर प्रसंगी पुणे येथील सिने आर्टिस्ट श्री सुहास वैद्य, त्याचबरोबर पुणे येथील व्यवसायिक श्री शेंडगे, ओम तेजा प्रोडक्शन चे तंत्र अधिकारी प्रतीक पाटील उपस्थित होते. येत्या काही दिवसात दोन्ही प्रोडक्शन चे दोन वेगवेगळे प्रोजेक्ट व एक संयुक्तिक प्रोजेक्ट लवकरच सुरू करणार असल्याची माहीती श्री वजीर शेख सर व महादेव शिरोळकर यांनी याप्रसंगी दिली. 
      प्रमुख पाहुणे श्री प्रदीप देवकर सर श्री शेंडगे व अभिनेते पत्रकार श्री सुहास वैद्य यांनी दोन्ही प्रोडक्शन ला त्यांच्या आगामी चित्रपट व इतर प्रोजेक्ट साठी खूप खुप शुभेच्छा दिल्या.
     सदर कार्यक्रमासाठी नाट्य व सिने क्षेत्रातील विविध मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement