Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बीसीसीआय ने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे.

मुंबई  - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - बीसीसीआय ने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. 

     रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. . श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

     वर्ल्ड कपसाठी 5 बॅट्समन, 2 विकेटकीपर बॅट्समन, 4 ऑलराउंडर, 1 रिस्ट स्पिनर आणि 3 फास्ट बॉलर अशी सर्वसमावेशक टीम इंडिया आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्याकडे ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव या तिघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. ईशान किशन आणि केएल राहुल हे विकेटकीपर बॅट्समन आहेत. वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी मिळाली आहे हे आपण पाहुयात.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर,  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव

कोणाचा पत्ता झाला कट 

विश्वचषकाच्या अंतिम 15 मध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या या यादीत एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान मिळाले नाही. 

         भारताचे संपूर्ण वेळापत्रक

▪️ 8 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया - चेन्नई

▪️ 11 ऑक्टोबर दिल्ली - अफगाणिस्थान

▪️ 14 ऑक्टोबर अहमदाबाद - पाकिस्तान

▪️ 19 ऑक्टोबर - पुणे - बांगलादेश

▪️ 22 ऑक्टोबर - धर्मशाला - न्यूझीलंड

▪️ 29 ऑक्टोबर - लखनौ - इंग्लंड

▪️ 2 नोव्हेंबर - मुंबई - श्रीलंका

▪️ 5 नोव्हेंबर कोलकाता - दक्षिण आफ्रिका

▪️ 12 नोव्हेंबर बेंगलोर - नेंदरलँड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement