सृजन द क्रियेशन च्या कलाकारांचं स्वप्न साकार
श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग
प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अर्थात हा सगळा घाट कलाकारांनी वर्गणी काढूनच घातला आहे. तेव्हा आपण सर्वांनी ह्या प्रयोगांना येऊन आशीर्वाद , प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती.
तर अशी ही नवोदित कलाकारांना घडवण्याची चळवळ सभासदांच्या वर्गणी मधून जमा झालेल्या रक्कमेवर, सहभागी कलाकारांनी वर्गणी काढून तसेच सृजन द क्रियेशनचे सर्वेसर्वा अभिनेता - दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या प्रयत्नांनी सुरु आहे. या स्तुत्य प्रयत्नांना बळ देत नव्या उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक नाट्यरसिकांनी या प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे.
जाहिरात


0 टिप्पण्या